शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

शिरोळमधील मातब्बर भाजपमध्ये दाखल

By admin | Updated: January 10, 2017 00:43 IST

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश : सर्वांना सन्मानाची पदे देणार : फडणवीस

शिरोळ : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, दलितमित्र अशोकराव माने, नृसिंहवाडीचे उपसरपंच धनाजीराव जगदाळे यांच्यासह जयसिंगपूर बाजार समिती सदस्य, सरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी अशा सुमारे १२० जणांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता शिरोळ तालुक्यातील या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. सर्वांना सन्मानाची पदे दिली जातील, शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच जिल्ह्यांत सकारात्मक अशा प्रकारचे काम सुरू आहे. या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. आपल्याला राजकारण नाही, तर समाजकारण करायचे आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.कागलनंतर शिरोळ तालुक्यात राजकीय भूकंप करण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून भाजपचे प्रयत्न सुरू होते. नव्या वर्षात आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या प्रयत्नाला शिरोळमध्ये यश आले. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिरोळ तालुक्यातील सुमारे १२० जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, आमदार सुरेश हाळवणकर, बाबा देसाई, सुरेशदादा पाटील, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज मगदूम, नगराध्यक्ष डॉ. नीता माने, नगरसेविका अ‍ॅड. सोनाली मगदूम, भाजपचे तालुकाध्यक्ष धैर्यशिल देसाई, रामचंद्र डांगे, विजय भोजे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)१२० जणांचा प्रवेशमुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या चार प्रमुख नेत्यांबरोबर आगरच्या सरपंच लक्ष्मी लोंढे, तमदलगे सरपंच सुरेखा कांबळे, शिरोळ सरपंच सुवर्णा कोळी, यड्राव सरपंच उषा तासगावे, राम खोत, बाळासाहेब शेख यांच्यासह सुमारे १२० जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यात भाजपला पक्षवाढीसाठी बळ मिळाले आहे.