शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

शिरोळ-दत्त, जवाहरला पुरस्कार प्रदान

By admin | Updated: September 20, 2016 00:02 IST

दिल्लीत सन्मान : गणपतराव पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उपस्थिती

शिरोळ/हुपरी : देशपातळीवरील उच्च साखर उतारा विभागात ऊस विकासाचा प्रथम पुरस्कार शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास, तर २०१५-१६च्या गळीत हंगामामध्ये ऊस गाळप साध्य केलेल्या तांत्रिक, आर्थिक, ऊस विकास योजना व संशोधन, आदी क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यास केंद्र सरकारचे मुख्य संचालक जी. एस. साहू यांच्या हस्ते दिल्ली येथे सोमवारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री दत्त कारखान्याचा पुरस्कार अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी, तर जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप. शुगर फॅक्टरीज, दिल्ली या संस्थेच्या वार्षिक सभेत देशपातळीवरील हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपाध्यक्ष अमित कोरे, संचालक कल्लाप्पाण्णा आवाडे, मानसिंगभाई पटेल, जयंतीभाई पटेल, शिवाजीराव नागवडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी उपस्थित होते. श्री दत्त कारखान्याने गळीत हंगाम २०१५-१६ मध्ये एकूण केलेल्या ऊस विकास, ऊस विकासाच्या अनुषंगाने कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांसाठी राबविलेल्या विविध ऊस विकास योजना, तसेच या योजना राबविल्यानंतर ऊस क्षेत्रामध्ये झालेली वाढ, उसाच्या टनेजमध्ये, तसेच रिकव्हरीमध्ये झालेली वाढ या गोष्टी विचारात घेऊन हा उच्च साखर उतारा विभागातील ऊस विकासाचा पुरस्कार कारखान्यास देण्यात आला.याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, संचालक युसूफ मेस्त्री, अनिल यादव, श्रेणिक पाटील, शरदचंद्र पाठक, अरुणकुमार देसाई, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, आण्णासाहेब पवार, इंद्रजित पाटील, रणजित कदम, रावसाहेब नाईक, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील, महेंद्र बागे, बाबूराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव उपस्थित होते.जवाहर शेतकरी साखर कारखान्यास अनेक पुरस्कारहुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास देश पातळीवरील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे, उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले व संचालक मंडळाला सन्मानित करण्यात आले. जवाहर कारखान्यास यापूर्वी नॅशनल फेडरेशन आॅफ शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे अशा नामवंत संस्थांकडून तांत्रिक, आर्थिक, कृषी, पर्यावरण, वीज बचत, व्यवस्थापन आदी क्षेत्रांत उत्कृष्ट कामकाजाबाबत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे, अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सर्व सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी व ऊस तोडणी मजूर, कंत्राटदार, आदींचे आभार मानले.