शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमधील जि. प., पं. सं. पोटनिवडणुकीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:24 IST

संदीप बावचे : लोकमत न्यूज नेटवर्क जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद गट, दानोळी पंचायत समिती गण तसेच ...

संदीप बावचे :

लोकमत न्यूज नेटवर्क

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद गट, दानोळी पंचायत समिती गण तसेच अब्दुललाट, राजापूर, राजापूरवाडी ग्रामपंचायतीतील चार जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. शिरोळ नगरपालिकेतही एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. घोसरवाड सरपंचपदाचा मार्गदेखील मोकळा झाला आहे. त्यामुळे ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर तालुक्यात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या तारखेकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांचे निधन झाल्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषदेची जागा रिक्त आहे. नुकत्याच झालेल्या दत्तवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इच्छुकांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार केला आहे. शिवाय, काँग्रेसकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबतही उत्सुकता असली तरी यड्रावकर गट, भाजपची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

दानोळी पंचायत समितीचे सदस्य सुरेश कांबळे यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र अपेक्षित आहे. अब्दुललाट ग्रामपंचायतीत तीन, राजापूर एक व राजापूरवाडी ग्रामपंचायतीतील दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत.

शिरोळ नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक दादासाहेब कोळी यांचे पद अपात्र ठरल्याने या जागेसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, निवडणुकीनंतर वर्षभराच्या आत जातीचा दाखला दिला नसल्याने कोळी यांचे नगरसेवकपद अपात्र ठरले होते. या एका जागेसाठी काँग्रेस, यड्रावकर गट, स्वाभिमानी प्रणित शाहू आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित आहे. पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीचा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या पोटनिवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे इच्छुकांच्या नजरा लागून आहेत.

चौकट - घोसरवाडचा मार्ग मोकळा

सरपंच आरक्षण सोडतीत घोसरवाडला अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण जाहीर झाले होते. मात्र, या पदाचा सदस्य नसल्याने ही जागा रिक्त राहिली होती. अनुसूचित जमाती महिला ऐवजी अनुसूचित जातीच्या सदस्याला सरपंचपद देण्याबाबत कार्यवाही झाली असून, सरपंच निवडीच्या तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे.