शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोल्हापुरात गाड्या खरेदीसाठी उडाली झुंबड

By admin | Updated: April 1, 2017 01:05 IST

दुपारीच काही शोरूमचे ‘शटर डाऊन’ : ‘बीएस-३’च्या सर्व हजर स्टॉक गाड्यांची तडाखेबंद विक्री

कोल्हापूर : बीएस-३ इंजिन असलेल्या गाड्यांची खरेदी-विक्री आणि नोंदणी केवळ शुक्रवारपर्यंतच करता येणार असल्याने अशा दुचाकी व चारचाकी गाड्या खरेदीसाठी वाहन विक्रेत्यांच्या दारात ग्राहकांची झुंबड उडाली होती. मात्र, दुपारपर्यंतच काही विक्रेत्यांनी स्टॉकमधील गाड्या संपल्याचे बोर्ड लावल्याने अनेकांची निराशाही झाली. भारत स्टेज-४ (बीएस ४) या मानके असलेलीच वाहने आज, शनिवारपासून विक्रेत्यांना विकता येणार आहेत. या निर्णयामुळे शुक्रवारी दिवसभर भारत स्टेज-३ मानके असलेल्या दुचाकीसह चारचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यात अगदी पाच हजारांपासून ते ४० हजारांपर्यंतची सवलत देण्यात आली. सवलत दिल्याने कमी झालेल्या किंमतीत गाडी घेण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून काही वाहन विक्रेत्यांच्या दारात ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. सकाळी अकरानंतर विक्रेत्यांच्या सवलतींमुळे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मॉडेलनुसार पाच हजारांपासून ४० हजारांपर्यंत काही विक्रेत्यांनी सूट दिल्याने या ‘बीएस-३ मानके’ असलेल्या गाड्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वाहन विक्रेत्यांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्टॉक संपल्याचे बोर्ड लावावे लागले, तरीही ग्राहक विक्रेत्यांच्या दारातून हलत नव्हते. विशेषत: होंडा, टीव्हीएस, यामाहा, बजाज, हिरो या कंपन्यांच्या गाड्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.०१ एप्रिल पासून बीएस-४ मानकांची पूर्तता न करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या (दुचाकी, तीन चाकी, चारचाकी किंवा व्यापारी) वाहनांची विक्री वाहन उत्पादक किंंवा विक्रेत्यांना करता येणार नाही. १ एप्रिलपासून बी.एस.-४ मानके नसलेली कोणतीही वाहने नोंदणी करता येणार नाहीत . जर वाहनांची विक्री ३१ मार्च २०१७ ला अथवा त्यापूर्वी केली असेल, तर वाहन विक्रीचा पुरावा सादर केल्यानंतर नोंदणी करता येणार आहे. त्यात फॉर्म नं.२१, इनव्हॉईस बिल, विमा प्रमाणपत्र, तात्पुरती नोंदणीपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल.- डॉ. डी. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी.गाडीवर किती सूटड्युएट, मेस्ट्रो एज, प्लेजर-१२,५००, एचएफ डिलक्स सीरिज, स्प्लेंडर प्लस - ५,०००, ग्लॅमर एक्स्प्रो, आय स्मार्ट १०००-७,५००, ज्युपिटर- ९,०००, व्हिक्टर - ९,०००, स्कुटी - ५,०००, अपाची - ९,०००, एक्स एल १००- ५,०००, टीव्हीएस विगो- ८,०००, फिनिक्स - १२,०००, अ‍ॅक्टिव्हा ३ जी - १३,०००, सीबीआर स्पोर्टस् बाईक - २२,०००, होंडा नवी- २०,०००.आरटीओकडे १२९९ वाहनांची झाली नोंदबीएस-३ इंजिन असलेल्या दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची शुक्रवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यातील शुक्रवारी सायंकाळपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दुचाकी-११७८, चारचाकी-४७, अवजड मालवाहतुकीची वाहने-७४ अशा १२९९ वाहनांची नोंद झाल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी दिली. प्रत्यक्षात वाहनांची विक्री तडाखेबंद झाल्याचे चित्र दिवसभर दिसले.