शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

२०१४ मध्ये चारही शहरांत शेट्टींची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:48 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ‘इचलकरंजी’, ‘जयसिंगपूर’, ‘पेठवडगाव’, ‘इस्लामपूर’ या ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ‘इचलकरंजी’, ‘जयसिंगपूर’, ‘पेठवडगाव’, ‘इस्लामपूर’ या शहरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या पारड्यात झुकते माप टाकले. या चारही शहरांत शेट्टींना मोठी आघाडी मिळाल्याने ते पावणेदोन लाख मताधिक्याचा आकडा गाठू शकले. आता राजकीय समीकरणाबरोबर गणितेही बदललेली आहेत. हे मताधिक्य कायम राखताना शेट्टींची दमछाक होणार आहे.मागील निवडणुकीत राजू शेट्टी यांना चार शहरांत एक लाख ३३ हजार ७२८, तर कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना एक लाख आठ हजार ५०८ इतकी मते मिळाली होती. चारही शहरांत शेट्टी यांना तब्बल २५ हजार २२० इतके मताधिक्य मिळाले. आता राजकीय गणिते बदलली आहेत. शेट्टी कॉँग्रेस आघाडीकडून, तर भाजप-शिवसेनेकडून धैर्यशील माने रिंगणात आहेत. इचलकरंजीत भाजप आघाडी, पेठवडगावमध्ये युवक क्रांतीची सत्ता आहे. जयसिंगपूरमध्ये राष्टÑवादी, कॉँग्रेसची सत्ता, नगराध्यक्ष भाजपचा आहे. इस्लामपूरमध्ये शिवसेना, भाजपप्रणित विकास आघाडीची सत्ता आहे. इचलकरंजीत राजू शेट्टी यांच्यासाठी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे व राष्टÑवादीने ताकद लावली आहे. तर धैर्यशील माने यांच्यासाठी शिवसेना, माने गट व आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रतिष्ठा केली आहे. इस्लामपूरमध्ये शेट्टींसाठी आमदार जयंत पाटील, तर मानेंसाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व विकास आघाडी प्रचारात आहे. जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील हे शेट्टी यांच्या, तर माने यांच्या पाठीशी नगराध्यक्षा डॉ. निता माने आहेत.कोणत्या भागातकोणाचा आहे होल्ड?इचलकरंजी, इस्लामपूर, जयसिंगपूर, पेठवडगावमध्ये राजू शेट्टी यांना मोठी आघाडी दिली होती.इस्लामपुरात विकास आघाडी, इचलकरंजीत भाजप मित्रपक्ष आघाडी, वडगावात युवक क्रांतीचे बहुमत आहे. जयसिंगपुरात नगराध्यक्ष भाजप आघाडीचा, बहुमत दोन्ही कॉँग्रेसचे आहे.शहर राजू शेट्टी कल्लाप्पाण्णा आवाडेइचलकरंजी ९७,६९१ ७७,८७९पेठवडगाव ६,४९५ ४,६५४जयसिंगपूर १३,०९४ ११,७०३इस्लामपूर १६,४४८ १४,२७२एकूण १,३३,७२८ १,०८,५०८