शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : शेट्टींनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा : प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:31 IST

सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशेट्टींनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा : प्रकाश आवाडेसांगलीच्या जागेसाठीच राहूल आवाडेंचा दबावतंत्र

कोल्हापूर : सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ही जागा ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने तो मान्यच करावा लागणार आहे. पण खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षाही आवाडे यांनी व्यक्त केली.आवाडे म्हणाले, सांगली व कोल्हापूरच्या राजकारणाची एकमेकाशी सांगड आहे. त्याचे प्रत्यंतर २००९ च्या लोकसभा निवडणूकीत दोन्ही कॉँग्रेसला आले. त्यात बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात कॉँग्रेसकडे पुणे, सोलापूर व सांगली हे तीनच मतदारसंघ आहेत. त्यातील सांगली द्यायचा म्हटला तर कॉग्रेस कार्यकर्त्यांचे नुकसान होणार, म्हणून या मतदारसंघ आपल्याकडेच रहावा, असा आग्रह होता.

कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे पोहचवण्याचे काम केले. त्यातूनच राहूल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरूवारी रात्री बारा वाजता खासदार राजू शेट्टी, कल्लाप्पाण्णा आवाडे व आपली चर्चा झाली. यामध्ये सविस्तर उहापोह झाल्यानंतर आपण सांगलीची जागा मागितली नव्हती.

तीन जागा मागितल्या होत्या त्यातील शेवटचा पर्याय सांगली होता, असे शेट्टी यांनी सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. त्यांनीही जागा वाटपात वरिष्ठ पातळीवरून सांगली ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले.

समन्वयाने जागेचा प्रश्न सुटल्याने सांगलीतील कोणीही कॉँग्रेसमध्ये जाणार नाही. पण राजू शेट्टी यांनी उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा, असे प्रकाश आवाडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, पिटर चौधरी, एस. के. माळी आदी उपस्थित होते.

माझ्या परवानगीनेच बंडराहूल आवाडे यांनी ‘हातकणंगले’तून उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करताना आपली परवानगी घेतली होती. आमच्यामध्ये चर्चा होऊनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

जागा कायमस्वरूपी सोडलेली नाहीसांगलीची जागा आघाडीच्या तडजोडीत ‘स्वाभिमानी’ला सोडलेले आहे. याचा अर्थ कायस्वरूपी गेली असा अर्थ होत नाही. आजच्या परिस्थितीत दिलेली जागा असल्याचे आवाडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरsangli-pcसांगलीhatkanangle-pcहातकणंगले