शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

त्या माउलीचा मुलासोबत जाण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:03 IST

उचगाव (ता. करवीर) येथील जयश्री बाळासाहेब पवार यांना घरी नेण्यासाठी मुलगा सचिन पवार हे बुधवारी दुपारी आले होते. मात्र त्यांनी मुलग्यासोबत जाण्यास नकार दिला. जयश्री पवार यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना सरसावल्या आहेत.

ठळक मुद्देत्या माउलीचा मुलासोबत जाण्यास नकारजयश्री पवार यांच्या मदतीसाठी सामाजिक संघटना सरसावल्या

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील जयश्री बाळासाहेब पवार यांना घरी नेण्यासाठी मुलगा सचिन पवार हे बुधवारी दुपारी आले होते. मात्र त्यांनी मुलग्यासोबत जाण्यास नकार दिला. जयश्री पवार यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना सरसावल्या आहेत.सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी गोपुडगे व रूपाली दलबंजन यांनी मंगळवारी दुपारी जयश्री पवार यांना पार्वती टॉकीज परिसरात बेवारस दिसल्या. त्यांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कार्यालयात पाठवले. याबाबत ह्यलोकमतह्णमधून बुधवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कुटुंबीनी विचारपूस सुरू केली.

बार असोसिएशनने लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली; तर दुपारी मुलगा सचिन पवार यांनी जैन बोर्डिंगमध्ये जाऊन आईची विचारपूस केली. तीन दिवस घरातून आले, आत्ता आलास काय? असे जयश्री यांनी झिडकारून दिल्याने ते तेथून निघून गेले.आमच्या जन्मापासून आईचा तसा स्वभाव आहे. खूप औषधोपचार केले; मात्र तिच्या वागण्यात बदल होत नाही. तिच्या या स्वभावामुळे आम्ही तिघे भावंडे आजीकडेच राहिलो आणि तिथेच वाढलो. माझा पंक्चरचा व्यवसाय आहे. त्यातून कुटुंब चालवतो, आईला काही कमी पडू दिले नाही. तरीही ती घरी राहत नाही. तिच्या या वागण्याने वडीलही वैतागले होते. आताही आम्ही घराबाहेर काढलेले नाही. तिच्या सततच्या अशा वर्तनामुळे मीच कोल्हापूर सोडून जाण्याच्या मन:स्थितीत असल्याची माहिती जयश्री पवार यांचा मुलगा सचिन पवार यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर