शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तिने भावासह अनाथांनाही केले आपलेस

By admin | Updated: August 11, 2014 00:44 IST

अतूट बंधन : सासरहून ती आली भावाला भेटण्यासाठी बालकल्याण संकुलाते

कोल्हापूर : व्यसनाधीन बापामुळे जन्मापासूनच नशिबी लागलेली गरिबी असल्याने एका लेकराची बालकल्याण संकुलात रवानगी, तर लेकीचे लग्न केले. अशा परिस्थितीमुळे बहीण-भावांची ताटातूट झाली. यावर हतबल न होता रूपाली आणि अजिंक्य यांनी बहीण-भावाच्या नात्याचा बंध कायम ठेवला आहे. त्यासह त्यांनी जन्मापासून आपले आई-वडील पाहिले नसलेल्यांनाही या नात्याद्वारे आपलेसे केले.हुपरी (ता. हातकणंगले) येथील कल्पना व विलास या दांम्पत्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. काही वर्षे त्यांचा सुखाचा संसार चालला. मात्र, अचानक विलास यांना दारूचे व्यसन लागले. त्यातच ते बेपत्ता झाले. ते बेपत्ता होऊन दहा वर्षे झाली. पती बेपत्ता असलेल्या आई कल्पना यांना उदरनिर्वाह चालविणे कठीण झाल्याने त्यांनी अजिंक्यला बाल संकुलात दाखल केले. चांगले स्थळ आल्याने मुलगी रूपालीचा विवाह करून दिला. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने कल्पना हुपरी येथेच मिळेल ते काम करतात. गेल्या तीन वर्षांपासून अजिंक्य बाल संकुल येथे आहे. आज, रविवारी सकाळपासून सर्व सवंगड्यांबरोबर संस्थेत आलेल्या शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींकडून अजिंक्यने राख्या बांधून घेतल्या. मात्र, त्याला सकाळपासून रूपाली दीदीची प्रतीक्षा लागून राहिली होती. दुपारी बारा वाजता रूपाली आली. तिने आपल्या भावासह इतर सवंगड्यांनाही राखी बांधली. ती फक्त आपल्या भावासाठी या ठिकाणी येत नाही, तर तिच्या भावासारखे अनेक अनाथ आहेत, त्यांच्यासाठी दरवर्षी न चुकता रक्षाबंंधनासाठी ती बालसंकुलात येते. तिच्या भावाबरोबर तिच्या राखीची वाट अनेक मुलेही पाहतात. रूपालीच्या माध्यमातून अनाथांनाही खरोखरचीच बहीण ओवाळण्यासाठी आल्यासारखे वाटते. (यातील नावे काल्पनिक घेतली आहेत.)