शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सराफांचा पुन्हा दोन दिवस बंद

By admin | Updated: March 22, 2016 00:49 IST

उद्या पुन्हा बैठक : जिल्हा सराफ संघाच्या बैठकीत एकमताने निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात आणखी दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. सराफ व्यवसायाला लागू केलेल्या अबकारी कराला विरोध करण्यासाठी देशाबरोबर जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून दुकाने बंद आहेत. त्याचबरोबर विविध मार्गांनी आंदोलने करून केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे. त्याअंतर्गत शनिवारी रात्री बंद मागे घेतल्याचा चुकीचा संदेश मिळाल्याने रविवारी सराफ व्यावसायिकांत द्विधा मनस्थिती होती. त्यातच काही व्यावसायिकांनी दुकाने सुरू केली होती. ती काही वेळानंतर बंद केली. त्यामुळे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष भरत ओसवाल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी देशभर आंदोलनाच्या माध्यमातून कशाप्रकारे केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे, त्यासंबंधी सविस्तर विवेचन केले. त्याचबरोबर शनिवारी दिल्लीत झालेल्या बैठकीतील वृत्तांतही दिला आणि त्यावेळी कशाप्रकारे चुकीचा संदेश दिला गेला आणि गोंधळ उडाला याचीही माहिती दिली. बुधवारी सकाळी पुन्हा बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्याचे ठरले. यावेळी कुलदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. माणिक जैन, बाबा महाडिक, राजेश राठोड, किरण गांधी, सुहास जाधव, संपत पाटील, रूपचंद ओसवाल, धर्मपाल जिरगे, सुरेश ओसवाल, महेंद्र ओसवाल यांच्यासह सभासद उपस्थित होते.दोन दिवस बंद ठेवण्याला कर्नाटकातूनही पाठिंबाजिल्ह्याबरोबर कर्नाटकातूनही आणखी दोन दिवस व्यवसाय बंद ठेवण्याला पाठिंबा दिला. निपाणी, चिकोडी, संकेश्वर, गोकाक, रायबाग येथील संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे सुरेश शेट्टी, अण्णासाहेब जडी, शशिकांत चडचाळे, रवींद्र शेट्टी, प्रकाश शहा, अनिल कोगनोळीकर आणि अक्षय पुरवंत यांनी बंदला पाठिंबा दिल्याची माहिती सुरेश गायकवाड आणि भरत ओसवाल यांनी दिली.