शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वस्तुसंग्रहालयातून उलगडणार शाहूचरित्र

By admin | Updated: February 15, 2017 23:54 IST

जन्मस्थळासाठी दरपत्रक निविदा प्रसिद्ध : दरानुसार पहिल्या टप्प्यातील अंदाजपत्रक तयार करणार

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहूंचे जीवनचरित्र तत्कालीन जीवनशैली, कुस्तीचे अ‍ॅनिमेशन, खडखडा, वाद्ये, भांडी, राजेशाही थाटाची अनुभूती देणाऱ्या वस्तू, भांडी, खेळ, वाद्ये अशा विविधांगांतून उलगडत जाणार आहे. त्यासाठी शाहू जन्मस्थळामध्ये साकारण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयासाठीच्या साहित्याचे दरपत्रक मागविण्याची निविदा बुधवारी पुरातत्त्व खात्याच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दरानुसार पहिल्या टप्प्यातील दोन कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. कसबा बावड्यातील लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचे सिव्हिल वर्क पूर्ण झाले असून, आता मुख्य वस्तुसंग्रहालयाच्या आराखड्यानुसार पुढील काम सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या वस्तुसंग्रहालयासाठी दोन कोटींचा निधी पुरातत्त्व खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या रकमेत प्राथमिक टप्प्यातील कामांना सुरुवात करण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. शाहू महाराजांची दुर्मीळ छायाचित्रे हाय रिझॉल्युशनमध्ये कॉपिंग आणि प्रिंट करण्यात येणार आहेत. जन्मस्थळ कक्षामध्ये राजेशाही लुक असलेले नक्षीदार वुलन्स, काचेच्या हंड्या बसविलेले पितळी झुंबर, कोल्हापूर संस्थानची राजचिन्हे, सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातांचे व पायांचे ठसे चांदीच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहेत. पंचधातू, फायबर माध्यमात म्युरल्स तयार करण्यात येणार आहेत. दिलेल्या प्रसंगानुसार कॅनव्हासवर तैलरंग अ‍ॅक्रॅलिक माध्यमात चित्रे तयार करणे, पंचधातंूमध्ये घोड्याचा पुतळा, तत्कालीन वाद्ये, साठमारीच्या खेळाची तसेच शेतीची अवजारे, तसेच फायबरमध्ये शाहू मिल्सची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. साकारण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयासाठीच्या साहित्य व वस्तूंसाठी कारागीर, ठेकेदार, चित्रकार, शिल्पकार, एजन्सीज यांच्याकडून दरपत्रक मागविण्यासाठीची निविदा बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, २५ तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्यक्ष शाहू जन्मस्थळ येथे निविदा भरण्याची मुदत देण्यात आली आहे. या दरपत्रकावरून पुरातत्त्व खात्याला साहित्याच्या रकमेचा अंदाज येणार आहे. त्यावरून पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्यावर कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या कामांना तांत्रिक मान्यता मिळण्यासाठी त्यांचे दरपत्रक आवश्यक आहे. बाजारपेठेतून आलेल्या या दरांवरून दोन कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाची निविदा काढण्यात येईल. यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. - उत्तम कांबळे, उपअवेक्षक, शाहू जन्मस्थळकुस्तीचा अ‍ॅनिमेशन शो या संग्रहालयात दुर्मीळ छायाचित्रातील रथाप्रमाणे बर्माटिक लाकडात रथ तयार करून त्यात हत्ती व त्यावर बसलेल्या माहुताची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. शाहू महाराज ज्या खडखड्यात बसून फेरफटका मारायचे, तो घोड्याचा खडखडा ब्रॉँझ धातूत बनवून त्याचा सेट उभारण्यात येणार आहे. याशिवाय कुस्तीच्या रोबोटिक अ‍ॅनिमॅओग्राफिक शोसाठी पैलवान इमाम बक्ष व गुलाम माहीद यांना सूचना देताना शाहू महाराज असे तीन रोबोटिक पुतळे आणि सेट असणार आहे.