शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांची अध्यक्षपदी फेरनिवड

By admin | Updated: May 9, 2017 23:51 IST

रयत शिक्षण संस्था; सचिवपदी अहमदनगरचे भाऊसाहेब कऱ्हाळे

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सचिवपदी अहमदनगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कऱ्हाळे यांची निवड झाली. चेअरमन पदावर डॉ. अनिल पाटील यांना कायम ठेवण्यात आले आहे.रयत शिक्षण संस्थेची सर्वसाधारण सभा मंगळवारी साताऱ्यातील मुख्यालयात पार पडली. या सभेत हा निर्णय घेतला. उपाध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार गणपतराव देशमुख, शंकरराव कोल्हे, जयश्रीताई चौगुले, एस. एम. पाटील, गोपीकिसन पाटील, अरुण कडू-पाटील या सहाजणांना संधी देण्यात आली. उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिवपदी कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांची तर आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास महाडिक यांची माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली. मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून डॉ. अनिल पाटील, अ‍ॅड. रवींद्र पवार, डॉ. एन. डी. पाटील, डॉ. पतंगराव कदम, आबासाहेब देशमुख, आमदार अजित पवार, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, मीनाताई जगधनी, रामशेठ ठाकूर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. वळसे, पाचपुते यांना संधीरयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, राजेंद्र फाळके, बबनराव पाचपुते या तिघांना संधी दिली आहे.