शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘शरद पवार चले जाव’

By admin | Updated: September 16, 2014 00:37 IST

शिवाजी चौकात नारा : टोलविरोधी समितीचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला फसविणाऱ्या काँग्रेस आघाडी सरकारला घरी बसविण्याचा नारळ उद्या, मंगळवारी मिरजकर तिकटी येथे दुपारी तीन वाजता फोडण्याचा निर्धार आज, सोमवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने शिवाजी चौकात धरणे आंदोलनात केला. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘चले जाव, चले जाव, शरद पवार चले जाव’, ‘आय.आर. बी.ला हटवा, साथ में आघाडी सरकार हटाव’ असा नारा दिला.कोल्हापूर टोलमुक्त होण्यासाठी आजपासून टोलविरोधी कृती समितीने कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघांत महिनाभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी आय.आर.बी. व जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली.यावेळी रामभाऊ चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरच्या प्रश्नांत पवार यांनी लक्ष घातलेले नाही. त्यांनी टोलचा प्रश्न सोडवावा, अन्यथा त्यांनी येथून जावे. आंदोलनाला नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, विनायक फाळके, माजी उपमहापौर संभाजी देवणे, नगरसेवक रमेश पुरेकर, आदींनी पाठिंबा दर्शविला. (प्रतिनिधी)