शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

दलित महासंघाकडून ‘शेण फेको’

By admin | Updated: January 17, 2015 00:41 IST

निषेध : जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयावर आंदोलन

कोल्हापूर : जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयातील गैरकारभाराच्या निषेधार्थ आज, शुक्रवारी दुपारी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी विचारेमाळ येथील कार्यालयासमोर ‘शेण फेको’ आंदोलन करून निषेध व्यक्त केला. सुनील वारे, वृषाली शिंदे अशा निषेधाच्या घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दुपारी साडेबाराच्या सुमारास कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत सोबत आणलेले शेण फेकून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी हा प्रकार हाणून पाडत त्यांना आत जाण्यापासून रोखले. तरीही सर्वजण आत जाण्याची भूमिका आंदोलकांनी कायम ठेवली. शेवटी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक यांच्यासह पाच-सहा जणांच्या शिष्टमंडळाला आत जाण्यास परवानगी दिली. कार्यालयात गेल्यावर ज्यांच्याविरोधात आपण आंदोलन करीत आहोत त्या अधिकारी वृषाली शिंदे यांना समोर पाहिल्यावर आंदोलकांचा पाराच चढला. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या टेबलावर शेण फेकण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांचा हा पवित्रा पाहून पोलिसांना त्यांना अडवत हे शेण ताब्यात घेऊन कचराकुंडीत टाकले. संतप्त आंदोलकांनी वृषाली शिंदे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना धारेवर धरले. काही वेळानंतर त्यांना निवेदन देऊन अधिकारी वृषाली शिंदे यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक यांच्यासह बाबासो दबडे, अनिल मिसाळ, जगदीश हेगडे, तेजस कंगणे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.