शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

शौमिकातार्इंनी सांगितला ‘महाडिक-शिंदे’चा वसा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:27 IST

गडहिंग्लज : महाडिकसाहेबांच्या पहिल्या विधान परिषद निवडणुकीच्या विजयात शिंदे साहेबांचा मोठा वाटा होता.

ठळक मुद्देजाणकारांच्या भुवया उंचावल्या : ‘अमल’ कार्यपद्धतीने स्वातीताई ‘प्रभावित’ ! एकमेकांवरील विश्वासाचा ‘महाडिक-शिंदे’ वसा आणि वारसा आपणही जपूयाअमल महाडिक यांच्या मध्यस्तीने शहराच्या विकासासाठी भरीव निधी मिळविण्यासाठी स्वातीतार्इंचे प्रयत्न सुरू

राम मगदूम ।लोकमत न्यूज नेटवर्कगडहिंग्लज : महाडिकसाहेबांच्या पहिल्या विधान परिषद निवडणुकीच्या विजयात शिंदे साहेबांचा मोठा वाटा होता. त्यानंतरही त्यांच्यावर ज्या-ज्यावेळी गुलाल पडला त्यामध्येही त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. अलीकडील अटीतटीच्या निवडणुकीतही त्यांनी महाडिक साहेबांनाच साथ दिली. एकमेकांवरील विश्वासाचा ‘महाडिक-शिंदे’ वसा आणि वारसा आपणही जपूया, असे आवाहन भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी येथील जनता दलाच्या नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरींना जाहीरपणे केले. त्यामुळे जाणकारांबरोबरच उपस्थित सर्व नागरिकांच्याही भुवया काहीशा उंचावल्या.निमित्त होतं... गडहिंग्लज नगरपालिकेने विकसित केलेल्या बगीचा लोकर्पण सोहळ्याचं. त्यानिमित्ताने शौमिकाताई पहिल्यांदाच गडहिंग्लजला आल्या होत्या. त्यांनी आपल्या भाषणात गडहिंग्लजला येण्याची तीन कारणे सोदाहरण सांगितली. त्यातील पहिले कारण म्हणजे, पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी गडहिंग्लज पालिका कृतिशील आहे. दुसरे म्हणजे, ‘शिंदे-महाडिक’ यांच्यातील ऋणानुबंध आणि तिसरे म्हणजे, १८ वर्षांपूर्वी महाडिक युवा मंच जिल्ह्यात सर्वप्रथम स्थापन करणारा अमोल हातरोटे हा तरुण कार्यकर्ताही इथलाच. या तिन्ही गोष्टींचा आवर्जून उल्लेख करून त्यांनी महाडिक शैलीच्या खास भाषणाची झलकच दाखवून दिली.‘स्वच्छ-सुंदर’ गडहिंग्लजचा नावलौकिक टिकविण्यासाठी नागरिकांना आवाहन करतानाच बहुउद्देशीय सभागृहासह अनेक प्रलंबित विकासकामे पाच वर्षांत मार्गी लावायची आहेत. त्यासंदर्भात आमदार अमल महाडिक यांनी आमची मुख्यमंत्र्यांशी खास भेट व चर्चा घडवून आणली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आपण प्रभावित झालो, असे स्वातीतार्इंनी प्रास्ताविकातच जाहीरपणे सांगून टाकले. त्यानंतर शौमिकातार्इंनी विश्वासाच्या राजकारणामुळेच गडहिंग्लज पालिका बरीच वर्षे शिंदेच्याकडे असल्याचे नमूद करून स्वातीतार्इंचे तोंडभरून कौतुकही केले. महाडिक-शिंदेमधील ऋणानुबंधाचा संदर्भ देत हा ‘वारसा’ जपूया, असे आवाहन करायलाही त्या विसरल्या नाहीत. त्यामुळेच गडहिंग्लजकर बुचकळ्यात पडले आहेत.गडहिंग्लजसाठी ‘महाडिकां’ची मध्यस्थी !दोन वर्षांपूर्वी नूल येथील एका कार्यक्रमात श्रीपतराव शिंदे यांना उद्देशून बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादांनी स्वातीतार्इंना आमच्याबरोबर पाठवा, असे आवाहन जाहीरपणे केले होते. दरम्यान, गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी जनता दलाशी युती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदेंनी मुश्रीफांशी ‘दोस्ती’ केली. त्यामुळे गडहिंग्लजच्या नाट्यगृहासाठी दिलेले पाच कोटी शासनाने परत घेतले. त्यानंतर झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता अबाधित राखलेल्या जनता दलाबरोबर भाजपची आघाडी झाली असतानाही अपेक्षित निधी गडहिंग्लजला मिळेनासा झाला आहे. त्यामुळेच अमल महाडिक यांच्या मध्यस्तीने शहराच्या विकासासाठी भरीव निधी मिळविण्यासाठी स्वातीतार्इंचे प्रयत्न सुरू असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.