शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘शालिनी’ची जागा अखेर बिल्डरच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:41 IST

कोल्हापूर : शालिनी स्टुडिओसाठीच्या दोन आरक्षित जागांचा आता व्यावसायिक वापर होण्याचा मार्ग मोकळा झाला. कारभाऱ्यांनी पद्धतशीरपणे रचलेला डाव तसेच ...

कोल्हापूर : शालिनी स्टुडिओसाठीच्या दोन आरक्षित जागांचा आता व्यावसायिक वापर होण्याचा मार्ग मोकळा झाला. कारभाऱ्यांनी पद्धतशीरपणे रचलेला डाव तसेच अधिकाºयांनी दाखविलेला हलगर्जीपणा यांमुळे शालिनी स्टुडिओ आता लवकरच नामशेष होईल. दरम्यान, या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत.शहराच्या पश्चिम भागात असलेल्या रि. स. नं. ११०४ पैकी भूखंड क्रमांक ५ (क्षेत्र ६३१०.६० चौरस मीटर) आणि भूखंड क्रमांक ६ (क्षेत्र १६१०१.६० चौ. मी.) हे दोन भूखंड शालिनी स्टुडिओ म्हणून आरक्षित ठेवले होते. या भूखंडांच्या एकत्रीकरणाच्या अनुषंगाने विकास नियंत्रण नियमावलीमधील तरतुदीनुसार हेरिटेज कॉन्झर्व्हेशन समितीकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार समितीच्या बैठकीत शालिनी स्टुडिओ याखेरीज अन्य वापर अनुज्ञेय होणार नाही. भूखंडावरील बांधकाम परवानगीसाठी हेरिटेज नियमावली लागू राहील, असा निर्णय झाला होता.त्यामुळे ही जागा स्टुडिओकरिता आरक्षित राहील, याबाबत आशादायक चित्र निर्माण झाले होते; परंतु हेरिटेज कॉन्झर्व्हेशन समितीच्या निर्णयानुसार शालिनी स्टुडिओ म्हणून या दोन जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव कार्यालयाने मंजुरीसाठी महासभेसमोर ठेवला होता. तो २० जुलै २०१७ रोजी झालेल्या महासभेत नामंजूर केला. अधिकारी आणि काही कारभाºयांनी मखलाशी केली होती. एखादा ठराव मंजूर झाला तरच काहीतरी मलिदा मिळतो, असे भासविणाºयांनी हा ठराव नामंजूर करायचा आहे असे सांगून आपले इप्सित साध्य करून घेतले आणि येथेच कारभाºयांनी पहिला डाव जिंकला होता. हा ठराव नामंजूर करण्याकरिता पैसे वाटल्याच्या चर्चेने महापालिकेत काहूर माजले होते.कारभाºयांचा कारनामा लक्षात आल्यानंतर, सार्वत्रिक टीका झाल्यानंतर हा ठराव मंजूर व्हावा म्हणून मनपातील दोन्ही आघाड्यांनी आयुक्तांना पत्रे दिली; पण एकदा मंजूर झालेला ठराव सहा महिने बदलता येत नाही, या सबबीखाली आरक्षण ठेवण्याचा फेरप्रस्ताव प्रशासनाने आणला नाही. दरम्यान, मनपा सभेत झालेल्या ठरावाची दखल घेऊन विकसक उच्च न्यायालयात गेले. मनपाच्या बाजूने न्यायालयात फारशा ताकदीने बाजू मांडली गेली नाही. त्यामुळे विकसकांची याचिका न्यायालयाने मान्य करीत त्यांच्या बाजूने निकाल दिला. विकसकाने शासनाच्या नगरविकास विभागाकडे अपील करून आपल्याला जागा विकसित करण्यास परवानगी द्यावी म्हणून अपील केले. त्यावरही सुनावणी झाली. तेथेही मनपाची बाजू मांडण्यास अधिकारी कमी पडले. उच्च न्यायालयाचे भूखंड विकसनाबाबतचे आदेश तसेच विकसकाचे मुद्दे विचारात घेऊन आरक्षित असलेल्या जागा विकसित करण्याबाबत मंजुरी देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश महापालिकेला दिले. तसे पत्र १७ नोव्हेंबरला मनपाला प्राप्त झाले.चित्रपटक्षेत्रातून तीव्र प्रतिक्रियाज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा शहा यांना माहितीच्या अधिकारात ही सर्व माहिती प्राप्त होताच चित्रपट क्षेत्रातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कारभारी नगरसेवक आणि अधिकाºयांनी चित्रपट रसिकांच्या भावनांचा घात केला असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. या संदर्भात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाºयांनी तातडीने मंगळवारी सायंकाळी बैठक घेऊन चर्चा केली. उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करता येईल का, या अनुषंगाने ही चर्चा झाली.