शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडी तालुक्यात गुऱ्हाळघरांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 5, 2015 23:48 IST

संख्येत प्रतिवर्षी घट : गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दरावर नजर; दरकपात झाल्यास व्यवसाय धोक्यात येणार

संजय पाटील-- सरुड-शाहूवाडी तालुक्यात वारणा नदीच्या पट्ट्यात गुऱ्हाळघरांच्या गाळपाला प्रारंभ झाला आहे, तर गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दरावर नजर आहे. हंगामात गुळाचा दर सरासरी चार हजार रुपयांच्या दरम्यान असावा. जर गूळ दरात व्यापाऱ्यांनी कपात केली, तर मात्र भविष्यात हा व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे असल्याचे जाणकार व्यक्त करीत आहेत.शाहूवाडी तालुक्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीस गुऱ्हाळघरांची धुराडी पेटते. या गुऱ्हाळघरामुळे किमान चार ते पाच महिने अनेकांना हक्काचा रोजगार मिळतो. यावर अनेकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. तालुक्यात यापूर्वी सुमारे दोनशेच्या पुढे गुऱ्हाळघरे होती; परंतु गुळाचा दर, कामगार कमतरता यांच्यामुळे गुऱ्हाळघरांच्या संख्येत प्रतिवर्षी घट होत असल्याचे दिसत आहे.गुऱ्हाळाचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी यासाठी लागणारे मजूर मिळविणे व ते टिकवून ठेवणे तसेच गुऱ्हाळावर गाळपास येणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सध्या साखर कारखान्यांच्या दरावर गुऱ्हाळघरांचे भवितव्य अवलंबून आहे. कारण गुळाला कमी भाव जर मिळाला तर उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे जिकडे दर तिकडे ऊस अशी स्थिती निर्माण झाल्यास गुऱ्हाळमालकांना उद्योग चालविणे अवघड जाते. गुळाला उत्पादन खर्चावर व ठरावीक रकमेपेक्षा जास्त दर जर ठरविला तरच गुऱ्हाळघरे सुरू राहतील, अन्यथा येत्या एक-दोन वर्षांत हा उद्योग पूर्ण संपण्याच्या मार्गावर जाणार असल्याचे जाणकार गूळ उत्पादकांतून बोलले जात आहे.गुऱ्हाळघरासाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता ही मोठी समस्या आहे. उत्पादन कमी व खर्च जास्त त्या तुलनेत मिळणारा दर कमी आहे. आवक जास्त झाली की व्यापारी दर पाडतात. साखर कारखान्यांचा दर व गूळ दर यांच्यातील फरक दहा टक्के गुळाला चांगला दर मिळतो, तर नव्वद टक्के गुळाला कमी दर मिळतो. त्यामुळे सरासरी दर मिळत नाही. शासनाने या व्यवसायाकडे लक्ष दिले नाही तर हा व्यवसाय पूर्ण बंद होईल.- मानसिंग पाटील, गुऱ्हाळघर मालक, सरूड.