शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

भ्रामक वृत्ती थोपविण्यासाठी शाहूंचे विचार गरजेचे

By admin | Updated: June 27, 2016 01:16 IST

शरद पवार यांचे मत : राजर्षी शाहू ग्रंथाचा हिंदीत अनुवाद प्रकाशित; शाहूंनी उपेक्षित माणूस केंद्रबिंदू मानला : एन. डी. पाटील

कोल्हापूर : समाजात भ्रामक कल्पना पसरविणारा वर्ग पुन्हा जोमाने वाढत आहे. ते समाजात चुकीचा पगडा पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा या कामकाजाबद्दल राजर्षी शाहू महाराजांना घृणा, संताप होता. अशा प्रवृत्तीला वेळीच दूर करण्यासाठी शाहूंच्या विचारांची नितांत गरज असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारी राजा’ या प्रा. डॉ. पद्मा कदम यांनी हिंदी अनुवादित केलेल्या शाहू चरित्रग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते रविवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. पवार म्हणाले, समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर दलितांचे विचार बदलण्यासाठी केला. माझ्याकडे सत्ता असताना देशात महिलांना ५० टक्के आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला. ही प्रेरणा मला शाहूराजांच्या स्मृतीतून मिळाली. शाहूंनी स्वातंत्र्यपूर्व काळात दलितांसाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी प्राथमिक शिक्षणाला त्यांनी पाठबळ दिले. डॉ. आंबेडकर यांना शाहूंच्या कार्यातूनच खरी प्रेरणा मिळाल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, दबलेल्या, पिचलेल्या वर्गाबाबत शाहूंनी राखीव जागांचा वटहुकूम काढला. त्या वटहुकुमामुळे आजही राज्यकर्ते चाचपडत आहेत. त्यांनी सामान्य, दुर्लक्षित, उपेक्षित माणूस केंद्रबिंदू मानून समाजकार्याचा मार्ग अवलंबला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहू ग्रंथाच्या माध्यमातून विचार मांडण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद आहे. समाजात जोपर्यंत समता निर्माण होत नाही तोपर्यंत शाहूंचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचले, असे म्हणता येणार नाही.डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात जो शाहूंचा प्रकल्प डोळ्यांसमोर ठेवला, त्याचा एक टप्पा आज पूर्ण केला. पंधरा वर्षांपूर्वी पॅलेसच्या प्रांगणात शाहूंचा पहिला ग्रंथ प्रकाशित करताना शरद पवार यांनी हा ग्रंथ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असा ठेवलेला संकल्प आज पूर्ण करीत आहोत. पवारांनी आता अराजकीय आत्मचरित्र लिहावे, अशी आपली इच्छाही असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. मंजूश्री पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रा. पद्मा पाटील, आदींनीही विचार मांडले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री सुनील तटकरे, अण्णासाहेब डांगे, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, प्रतिभा शरद पवार, सरोज पाटील, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, प्रा. राजन गवस, प्रा. अशोक चौसाळकर, मेघा पानसरे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाव न घेता मोदींना टोलाभारताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विज्ञानवादी राज्यघटना स्वीकारली असताना आमचे सहकारी संसदेत जाताना पायरीवर डोके टेकून नमस्कार करतात, मगच संसदेत प्रवेश करतात. यालाच म्हणावे का विज्ञानवादी? असा टोला पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.फेसबुक पेजचे उद्घाटनयावेळी डॉ. प्रा. पद्मा पाटील आणि निहाल शिपूरकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला; तर राजर्षी शाहू प्रचार व प्रसार गु्रपतर्फे केलेल्या फेसबुक पेजचा आणि ‘शाहू आॅनलाईन क्विझ कॉम्पिटिशन’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.