शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
2
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
3
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
4
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी संकटमोचक ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
5
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
6
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
7
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
8
आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
9
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
10
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
11
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
12
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
13
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
14
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
15
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
16
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
17
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
18
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
19
मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
20
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाहूपुरी, दिलबहार, पीटीएमचा स्फोटक हाफ संजय हंचनाळे

By admin | Updated: February 17, 2017 01:42 IST

मॅन आॅफ द टुर्नामेंटस्’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. हा त्याच्या जीवनातील एक आठवणीचा क्षण

गोव्यामध्ये झालेल्या स्पर्धेत संजय हंचनाळेला ‘मॅन आॅफ द टुर्नामेंटस्’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. हा त्याच्या जीवनातील एक आठवणीचा क्षण आहे.संजयच्या मतानुसार कोल्हापुरात चांगली मैदाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे फुटबॉलची म्हणावी इतकी प्रगती झाली नाही. कोल्हापूरपेक्षा पुणे शहर फुटबॉलमध्ये प्रगत होत आहे. संजय राजाराम हंचनाळे याचा जन्म दि. ९ नोव्हेंबर १९६८ ला कोल्हापुरातील जवाहरनगरात झाला. हा परिसर मंगळवार पेठेला लागून असल्याने फुटबॉलचे वारे काही प्रमाणात या भागातही खेळले आहे. त्यामुळे फुटबॉलवेड्या लहान मुलांमध्ये संजय लहानपणीच सहभागी झाला. जवाहरनगर ते मंगळवार पेठेत लहान मुलांचे क्लब असत. त्या लहान क्लबमध्ये मुलांच्या नेहमी स्पर्धा होत. बहुधा टेनिस चेंडूच असे. सेंट झेवियर शाळेत आल्यापासून संजयची फुटबॉलची गोडी आणखी वाढली. गल्लीगल्लीतून होणाऱ्या लहान मुलांच्या ४ फूट ११ इंच उंचीच्या अटीतटीच्या सामन्यात संजय संधी मिळेल त्या प्लेसवर खेळू लागला. इथेच त्याची जादू दिसू लागली. सेंट झेवियर शाळेत शिक्षण घेत असताना खेळ शहरस्तरापर्यंतच पोहोचत असे. पुढे त्याने गोपालकृष्ण गोखले कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजच्या संघात संजयला सेंटर हाफ या महत्त्वाच्या जागेवर खेळण्याची संधी मिळाली. इथे त्याच्या खेळामध्ये परिपक्वता आली. १९ वर्षांखालील शालेय स्तरावरील सामन्यात सेंटर हाफ अथवा राईट, लेफ्ट कोणत्याही प्लेसवरून त्याचा खेळ उठावदार होऊ लागला.संजयच्या पायात अफलातून ताकद होती. फुटबॉल खेळात असणाऱ्या सर्व तंत्रावर त्याची हुकूमत. विशेषत: बॉल कंट्रोलिंंग, बॉल ड्रिबलिंंग करीत आपल्या फॉरवर्ड खेळाडूला अचूक बॉल सप्लाय करण्याची किमया अजोड होती. संजयचा ‘हाफ’चा खेळ अतिशय तंत्रशुद्ध होता. अनेकवेळा चार-पाच प्रतिस्पर्धी खेळाडू चकवत संजयने गोल करून वाहवा मिळविली आहे. त्याच्या हाफ व्हॉली किक, लो ड्राईव्ह व हाय ड्राईव्ह किकमध्ये नजाकत होती.यशवंत कातवरे याचवेळी शाहूपुरी फुटबॉल संघाचा संघटक व कर्णधार होता. तो आपल्या संघाची बांधणी करीत होता. संजयचा फुटबॉल यशवंतच्या नजरेतून सुटला नाही. यशवंतने संजयला आपल्या सीनिअर शाहूपुरी संघात हाफ या जागेवर सामील करून घेतले आणि संजयच्या खेळाचा परीघ विस्तारला. या संघात यशवंत कातवरे, बाबू सांगवडेकर, भोला सांगवडेकर, गिरीश शहा, बाळू रेडेकर हे साथीदार होते. या संघातून संजयचा खेळ चांगलाच उठावदार झाला. अनेक स्थानिक स्पर्धांत तो या संघातून खेळला. त्याचा हाफचा उत्कृष्ट खेळ पाहून पीटीएमसारख्या बलाढ्य संघात त्याला स्थान मिळाले. या संघात अफलातून हाफ खेळणारा आनंदा ठोंबरे, शरद पोवार, संभाजी जाधव यासारखे नामांकित खेळाडू सहकारी म्हणून लाभले. पुन्हा तिसऱ्यावेळी प्रसिद्धीच्या वलयात असणाऱ्या दिलबहार क्लबमध्ये त्याला संधी मिळाली. संजय आता दिलबहार क्लबमधून स्थानिक व बाहेरगावच्या स्पर्धा खेळू लागला.स्थानिक सर्व स्पर्धा खेळून संजयने मिरज, सांगली, गडहिंग्लज, बेळगाव, पुणे, मुंबई इथल्या स्पर्धांतही चमक दाखविली. गोवा, हिंंगोली, जबलपूर येथील प्रेक्षकांकडून वाहवा मिळविली. संतोष ट्रॉफी स्पर्धेकरिता निवड होणे ही सन्मानाची बाब समजली जाते. संजयची सन १९९१ साली संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली होती. संजयने पदवी शिक्षणाकरिता शहाजी सीनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. या कॉलेजकडून विभागीय व आंतरविभागीय स्पर्धेतून खेळताना संजयने विशेष चमक दाखविली. त्याचा नेत्रदीपक खेळ पाहून वेस्ट झोनकरिता शिवाजी विद्यापीठ संघात सन १९९३ आणि १९९४ अशी दोन वेळा जबलपूर आणि चंदीगड (पंजाब) येथील स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धांतही संजय विशेष प्रसिद्धी मिळवून गेला. गोव्यामध्ये झालेल्या स्पर्धेत संजयला ‘‘मॅन आॅफ द टुर्नामेंटस्’’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. हा त्याच्या जीवनातील एक आठवणीचा क्षण आहे.संजयला फुटबॉलच्या प्रसिद्धी वलयामुळे अनेक जिवाभावाचे मित्र लाभले. संजयच्या मतानुसार कोल्हापुरातील आपल्या खेळाडूंना चांगली मैदाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या फुटबॉलची म्हणावी इतकी प्रगती झाली नाही. कोल्हापूरपेक्षाही पुणे शहर फुटबॉलमध्ये प्रगत होत आहे. वयाच्या १३ व्या वर्षांपासून फुटबॉलवर वर्चस्व गाजविणारा संजय तब्बल २० वर्षे फुटबॉल खेळत राहिला. (उद्याच्या अंकात : सुरेश जरग)