शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘शाहू साखर’ कारखाना गुणवत्ता व्यवस्थापनात ठरला देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

कोल्हापूर : पर्यावरण रक्षण आणि कामगारांची सुरक्षिततेबाबतच्या उत्कृष्ट गुणवत्ता व्यवस्थापनाबद्दल जर्मनीच्या टीयूव्ही राईनलँड या कंपनीने श्री छत्रपती शाहू सहकारी ...

कोल्हापूर : पर्यावरण रक्षण आणि कामगारांची सुरक्षिततेबाबतच्या उत्कृष्ट गुणवत्ता व्यवस्थापनाबद्दल जर्मनीच्या टीयूव्ही राईनलँड या कंपनीने श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला आयएसओ मानांकन प्रमाणपत्रे देऊन सन्मानित केले आहे. हे प्रमाणपत्र मिळविणारा ‘शाहू साखर’ हा देशातील पहिला आणि अव्वल साखर कारखाना ठरला असल्याचे या कारखान्याचे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी मानून ‘शाहू साखर’चे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांनी शेतकऱ्यांचे हित, गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती, आर्थिक आणि कामातील शिस्त यावर आधारित कार्यसंस्कृतीचा कारखान्यात सुरुवातीपासून अवलंब केला. काळाची गरज ओळखून बदल स्वीकारल्याने ‘शाहू साखर’चा आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा ब्रँड निर्माण झाला. या ब्रँडची ओळख, विश्वास अधिक ठळक करण्याच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून टीयूव्ही राईनलँड कंपनीचे आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहे. या कंपनीने केलेल्या सूचनांनुसार कारखान्यात विविध बदल केले. त्यामुळे आयएसओ (१४००१ :२०१५ आणि ४५००१ : २०१८) अशी दोन प्रमाणपत्रे मिळविणारा ‘शाहू साखर’ हा देशातील ५२० साखर कारखान्यांमधील पहिला कारखाना ठरला असल्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी सांगितले. या वेळी उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

प्रतिक्रिया

या मानांकनांमुळे ‘शाहू साखर’ या ब्रँडला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक बळकटी मिळणार असल्याने कारखान्याला आणि सभासदांना मोठा फायदा होणार आहे. आमच्या कारखान्याने या मानांकनांची साखर उत्पादन आणि विक्री व्यवसायात पहिल्यांदा सुरुवात केल्याचा अभिमान आहे.

-समरजित घाटगे

चौकट

मानांकनांची यासाठी मदत

आयएसओ १४००१: २०१५ हे मानांकन पर्यावरण व्यवस्थापन कार्यपद्धतीसाठी आहे. त्यामुळे कारखान्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांचे प्रमाण कमी होण्यासह पाणी, वीज, वाफ यांचा काळजीपूर्वक, योग्य प्रमाणात वापर करण्यास मदत होते. आयएसओ ४५००१ : २०१८ हे मानांकन व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन कार्यप्रणालीसाठी आहे. कामाच्या जागेची सुरक्षितता, अपघात आणि धोक्याची संभाव्यता लक्षात घेऊन ते टाळण्याची पूर्वतयारी, योग्य सुरक्षित साधनांचा पुरवठा व वापर या कार्यप्रणालीमध्ये केले जात असल्याचे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

पॉईंटर

कारखान्याला आतापर्यंत प्राप्त झालेली आंतरराष्ट्रीय मानांकने

१) गुणवत्ता व्यवस्थापन कार्यप्रणालीसाठीचे ‘आयएसओ ९००१:२०१५’ (सन २००२ आणि २०१८)

२) अन्न सुरक्षा व्यवस्थापन कार्यपद्धतीबाबतचे ‘एफएसएससी २२०००’

३) अरब देशात साखर उत्पादने विक्रीसाठीचे ‘हलाल सर्टिफिकेट’

४) ज्यू देशामध्ये साखर उत्पादने विक्रीसाठीचे ‘कोशर सर्टिफिकेट’