शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

शाहू समाधीचा संकल्प सत्यात उतरणार काय?

By admin | Updated: June 25, 2015 01:05 IST

चिंता शाहूप्रेमींना सतावत आहे.

संतोष पाटील/ कोल्हापूर राजर्षी शाहू महाराज यांनी हयात असतानाच आपली समाधी उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. पुढील पिढीला शाहूंच्या विचारांनी प्रेरणा देणारे समाधिस्थळ नर्सरी बाग (सी वॉर्ड, सि.स.नं.२९४८) येथे उभारण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. सात कोटी रुपयांच्या या समाधिस्थळासाठी मनपाकडे फक्त ७५ लाख रुपयांचीच उपलब्धता आहे. राज्य शासनाच्या मदतीशिवाय समाधिस्थळ विकासाचा संकल्प सत्यात कसा उतरणार, याची चिंता शाहूप्रेमींना सतावत आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी सी वॉर्डातील नर्सरी बाग येथे आपल्या समाधीची व्यवस्था करावी, असे १३ सप्टेंबर १९१६ मध्ये आदेशात लिहून ठेवले आहे. या आदेशात शाहू महाराजांनी त्यांच्या समाधीची जागा नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराजवळ निश्चित करून ठेवली. समाजातील दीन-दलित, बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर कार्य करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावेत, यासाठी समाधिस्थळ व परिसर विकसित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. शाहू समाधिस्थळ येथील थोडीच जागा महापालिकेने संपादित केली आहे. शाहू समाधिस्थळ विकसित करण्यासाठी १०७६९ चौरस मीटर इतक्या जागेची आवश्यकता आहे. महापालिका प्रशासनाने ७५५३ चौरस मीटर जागा यापूर्वीच ताब्यात घेतली आहे. उर्वरित आवश्यक ३२१५ चौरस मीटर जागा छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट यांच्या मालकीची आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा समाधिस्थळ परिसर विकसित करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती श्रीमंत शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांना महापालिकेने केली. ‘शाहूंच्या विचारास शोभेल, पवित्र राहील, असे समाधिस्थळ करा, आमची काही हरकत नाही. हव्या त्याप्रकारे कागदोपत्री सोपस्कार आम्ही पूर्ण करू’, असे आश्वासन श्रीमंत शाहू महाराज यांनी मनपाला दिले आहे. सध्या या जागेवर हिरवा पट्टा (ग्रीन झोन) आरक्षण आहे. नगररचना कायदा ‘कलम ३७’ अन्वये यामध्ये पब्लिक झोन (सार्वजनिक वापर) असा बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. समाधिस्थळ विकसित करण्यासाठी महापालिकेचा ४ कोटी ७ लाख ४४ हजार रुपयांचा विकास आराखडा तयार होता. सध्याच्या डीएसआरप्रमाणे आराखड्यासाठी आता सात कोटी रुपयांची गरज आहे. महापालिकेच्या स्वनिधीतून पहिल्या टप्प्यात स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तत्कालीन महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या हस्ते २९ नोव्हेंबर २०१३ ला समाधिस्थळाचे भूमिपूजन झाले. नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी ५१ हजार रुपये व महापौरांचे एक महिन्याचे मानधन तसेच नगरसेवक सचिन चव्हाण यांनीही ५१ हजार रुपये समाधीसाठी देण्याचे जाहीर केले. समाधिस्थळ विकसित करण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने स्थायी समिती सभापती आदिल फरास प्रयत्न करीत आहेत.