शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बाबा भांड यांच्या पुस्तकात शाहू महाराजांची बदनामी, सुभाष देसाई यांची तक्रार : परिच्छेद काढून टाकण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोल्हापूर : लेखक बाबा भांड यांनी लिहिलेल्या युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील कादंबरीत शाहू महाराज हे आपल्या संस्थानातील ...

कोल्हापूर : लेखक बाबा भांड यांनी लिहिलेल्या युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील कादंबरीत शाहू महाराज हे आपल्या संस्थानातील शस्त्रधारी देशभक्तांच्या हालचालींची बित्तंबातमी काढून ती मुंबई सरकारला तत्परतेने कळवत होते असा उल्लेख असून तो शाहू महाराज यांची बदनामी करणारा आहे. तो तातडीने वगळण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांनी केली आहे.

देसाई त्यासंबंधीच्या निवेदनात म्हणतात, भांड यांच्या साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील कादंबरी खूप गाजली आहे. सयाजीराव गायकवाड यांचे छत्रपती शाहू महाराजांशी नाते संबंधही होते. दोघेही मोठे समाजसुधारक. ब्रिटिश राजवटीत या दोघांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली. एका बाजूला सनातनी ब्राह्मण समाजाचा विरोध आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांकडून सर्व प्रकारची मुस्कटदाबी या दोन्ही महाराजांच्या वाट्याला आली. युगद्रष्टा महाराजा या चरित्र ग्रंथांमध्ये पान २८३ वर एक परिच्छेद आहे. त्यात म्हटले आहे, " अरविंद यांचे बंधू क्रांतिकारक वारिंद्र घोष बडोदामध्ये आले आहेत. त्यावेळेला अरविंद घोष म्हणाले " बडोदा संस्थान आणि कोल्हापूर संस्थानांच्या प्रमुखात हाच मोठा फरक आहे, आपल्या संस्थानातील शस्त्रधारी देशभक्तांच्या हालचालींची बित्तंबातमी काढून ती मुंबई सरकारला तत्परतेने कळवण्याचे संस्थानिक कर्तव्य म्हणून कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी जसे अनेक वर्षे चोख बजावले आहे पण, तसे सयाजीराव महाराज यांनी केल्याचा एकही पुरावा आढळत नाही. "

कादंबरीतील हे भाष्य कल्पनाविलास म्हणून बाबा भांड यांनी रचले आहे का, ते सत्याचे खरे दर्शन आहे हे भांड यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांनी ब्रिटिशांचे लांगुलचालन केले आणि देशभक्तांना वाऱ्यावर सोडले असा याचा अर्थ होतो. तो महाराज यांच्यावर अन्याय करणारा आहे. या संदर्भातले उदाहरण बाबा भांड यांनी पुराव्यानिशी द्यावे, अन्यथा अनवधानाने छत्रपती शाहू महाराजांची बदनामी केली अशी कबुली देऊन प्रसिद्ध झालेल्या सर्व आवृत्तीतून तो परिच्छेद तातडीने काढून टाकावा.