शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

‘अग्निदिव्य’मधील ‘शाहू’ हरपले

By admin | Updated: March 4, 2017 01:10 IST

पुण्यात प्रयोग सुरू असताना सागर चौगुले यांचे हृदयविकाराने निधन

पुणे : रंगभूमीवर प्रयोग सुरु असतानाच ‘अग्निदिव्य’या नाटकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांंची मुख्य भूमिका साकारणाऱ्या सागर शांताराम चौगुले (वय ३८) या हरहुन्नरी कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला.पुणे येथील टिळक स्मारक रंगमंदिर येथे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सागर यांच्यासारख्या उमद्या कलाकाराच्या अशा अचानक जाण्याने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. सागर हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शांताराम चौगुले यांचे चिरंजीव व ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचे भाचे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाची मुलगी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. पुण्यातील टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये शुक्रवारी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरु होती. काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांंच्या जीवनावर आधारित ‘अग्निदिव्य’हे नाटक अंतिम फेरीत होते. सुनील माने यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. कोल्हापूर संघाचा ४० कलाकारांसह ‘अग्निदिव्य’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटकाच्या सुरुवातीपासून शाहू महाराजांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या सागर यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. मात्र, नाटकाचे मध्यांतर होण्याआधीच नाटकातील आपले संवाद म्हणतानाच सागर यांना हृदयविकाराचा तीव झटका आला आणि तो रंगमंचावर कोसळला. सहकलाकारांनी तातडीने त्यांंना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ; परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सागर हे मूळचे कोल्हापूरचे असून चित्रपट निर्माते शांताराम चौगुले यांचे चिरंजीव होत. त्यांचा कोल्हापूरमध्ये जाहिरात क्षेत्राशी निगडित व्यवसाय आहे. मात्र, अभिनयाच्या आवडीमुळे महाविद्यालयीन जीवनापासूनच ते नाटकांमध्ये भाग घेत असत. सहा महिन्यांपूर्र्वीच ‘अग्निदिव्य’ हे नाटक बसविण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी साकारलेल्या शाहू महाराजांच्या भूमिकेचे सर्वच स्तरांतून कौतुक होऊन त्यांना वाहवा मिळत होती. शुक्रवारीही पुण्यात नाटक सादर करताना त्यांनी सर्वच रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. सागर यांनी नाटकाबरोबर काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. लवकरच त्यांचा ‘सासू आली, अडचण झाली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. (प्रतिनिधी)शाहू महाराजांची हुबेहूब भूमिकाराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची भूमिका सागर हा अत्यंत ताकदीने उभा करणारा कलावंत होता. नाटकातील मध्यवर्ती भूमिका त्याची होती. साक्षात शाहू महाराज आपल्यासमोर उभे आहेत, असे वाटे. तो बोलताना अंगावर शहारे यायचे... इतका जिवंतपणा त्याने भूमिकेत ओतला होता. शाहू महाराज जिवंत असते तर त्याचा अभिनय पाहून त्यांनी या कलावंताला गळ्यातील मोत्याचा हार काढून दिला असता.