शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

शाहू कारखाना बिनविरोधच्या मार्गावर

By admin | Updated: September 6, 2016 23:48 IST

पंचवार्षिक निवडणूक : शाहू पॅनेलची १५ नावे जाहीर; आज अर्ज माघारीची अंतिम तारीख

कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जवळपास बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून, १५ जागांसाठी १७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. या १५ जागा स्वर्गीय विक्रमसिंहराजे श्री शाहू शेतकरी पॅनेलने अधिकृत केलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज, बुधवारी अंतिम तारीख आहे. दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी १५ जणांची यादी जाहीर केली.सत्ताधारी स्वर्गीय विक्रमसिंहराजे श्री शाहू पॅनेलचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे - श्रीमंत सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे (महिला गट), समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे (कागल), वीरकुमार आप्पासो पाटील (कोगनोळी, ता. चिकोडी), अमरसिंह गोपाळराव घोरपडे (माद्याळ), यशवंत जयवंत माने (कागल), युवराज अर्जुनराव पाटील (मौ. सांगाव), धनंजय सदाशिव पाटील (केनवडे), बाबूराव ज्ञानू पाटील (गोकुळ शिरगाव), भूपाल विष्णू पाटील (कोगील बुद्रुक), मारुती दादू निगवे (नंदगाव), सचिन सदाशिव मगदूम (पिंपळगाव खुर्द, सर्व ऊस उत्पादक गट), रुक्मिणी बंडा पाटील (दिंडनेर्ली, महिला गट), तुकाराम अमृता कांबळे (व्हन्नूर, मागासवर्गीय राखीव गट).मंगळवारअखेर जे १७ अर्ज शिल्लक आहेत, त्यामधील ही १५ नावे आहेत. दोन उमेदवारांचे ऊस उत्पादक गटातून अर्ज शिल्लक आहेत. हे दोघे आज माघार घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. ९) अधिकृतपणे आता बिनविरोध झालेल्या १३ जागांसह एकूण १५ जागा बिनविरोध झाल्याची घोषणा केली जाईल. (प्रतिनिधी)परंपरा जपण्याचा प्रयत्न : समरजितसिंहकागल : छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आमच्या गटाच्या कार्यकर्त्यांसह अपक्षांनीही मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी एक-दोघांचा अपवाद वगळता सर्वांनी बिनशर्त माघार घेऊन स्वर्गीय राजेंच्या पश्चातही बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे, असे उद्गार समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत काढले.स्वर्गीय विक्रमसिंहराजे श्री शाहू शेतकरी पॅनेलच्या अधिकृत १५ जणांच्या उमेदवारीची यादी त्यांनी जाहीर केली. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार वीरकुमार पाटील, वीरेंद्रसिंह घाटगे आणि सर्व उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांच्या यादीचे वाचन वीरकुमार पाटील यांनी केले.समरजितसिंह घाटगे म्हणाले की, कागल तालुक्यातीलच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्यातून शाहू साखर कारखाना बिनविरोध करावा, यासाठी विविध नेतेमंडळींनी आवाहन केले. पाठिंबा मागण्यासाठी मी फोन करणार होतो, त्यापूर्वीच या सर्वांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. याची सुरुवात तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. त्यानंतर संजयदादा मंडलिक, बाबासाहेब पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, रणजितसिंह पाटील यांच्यासह विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. तालुक्याबाहेरही आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, गणपतराव पाटील, संग्रामसिंह नलवडे, आदींनीही असे आवाहन केले. सोमवारपर्यंत नऊ अपक्षांचे अर्ज शिल्लक होते. त्यापैकी ७ अर्ज माघार घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रयत्न केले, तर खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत यांनीदेखील फोनवर संपर्क साधत पाठिंबा व्यक्त केला आहे. चिकोडी तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी हीच भूमिका घेतल्याने आता बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अजून दोघांचे अर्ज शिल्लक आहेत, पण तेदेखील माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करतील, असा मला विश्वास आहे. (प्रतिनिधी)नव्या-जुन्यांचा मेळसत्ताधारी गटाच्या पॅनेलची घोषणा म्हणजे नूतन संचालकांचीच घोषणा असल्याने पत्रकार परिषदेच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांसह कागल, करवीर, चिकोडी (कर्नाटक) तालुक्यांतही उमेदवारांच्या यादीबद्दल उत्सुकता होती. मात्र, समरजितसिंह घाटगे यांनी नव्या-जुन्यांचा सुरेख मेळ घातला आहे. सात विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देत सात नवे चेहरे घेतले आहेत, तर पाच वर्षांच्या खंडानंतर मारुती ज्ञानदेव पाटील यांना संधी दिली आहे. करवीरमधील चारही चेहरे बदलण्यात आले आहेत.