शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

दिल्लीमध्ये ‘शाहू छत्रपती’ प्रदर्शन लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीर संस्थानचा अभिजात भारतीय लघुचित्रशैलीच्या माध्यमातून मांडलेला इतिहास थक्क करतो. ‘युनाते’चे कलाकार अभिनंदनासाठी पात्र आहेत. म्हणूनच हेच प्रदर्शन लवकरच दिल्लीमध्ये आयोजित केले जाईल, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी रविवारी दिली. येथील युनाते क्रिएशन्सच्या वतीने आयोजित केलेल्या ‘शाहू छत्रपती’ प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.येथील शाहू स्मारक भवनमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीर संस्थानचा अभिजात भारतीय लघुचित्रशैलीच्या माध्यमातून मांडलेला इतिहास थक्क करतो. ‘युनाते’चे कलाकार अभिनंदनासाठी पात्र आहेत. म्हणूनच हेच प्रदर्शन लवकरच दिल्लीमध्ये आयोजित केले जाईल, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी रविवारी दिली. येथील युनाते क्रिएशन्सच्या वतीने आयोजित केलेल्या ‘शाहू छत्रपती’ प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.येथील शाहू स्मारक भवनमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये शिवाजी महाराजांपासून शाहू छत्रपती यांच्यापर्यंत अनेकांची काढलेली चित्रे मांडण्यात आली आहेत.दरम्यान, प्रदर्शनातील काही कलाकृती देशभरातील विविध खासदारांना दिल्या जातील. तसेच कोल्हापुरात सुसज्ज कलादालनासाठी लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून द्या. तो मंजूर करून आणला जाईल, असेही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले.प्राचार्य अजेय दळवी म्हणाले, राजस्थानमध्ये शाहू महाराजांची छायाचित्रांखाली केवळ ‘महाराजा’ असे लिहून ती विकली जातात आणि परदेशातील लोक ती खरेदी करतात. ही बाब लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांनाच भारतीय लघुचित्रशैलीत सर्वांसमोर आणणे आवश्यक असल्याचे वाटले. तसे मत व्यक्त केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी कष्टपूर्वक या कलाकृती साकारल्या आहेत.प्रतीक्षा व्हनबट्टे, आकाश झेंडे, शुभम चेचर, दुर्गा आजगावकर, अभिषेक संत, पुष्पक पांढरबळे, अनिशा पिसाळ यांच्या कलाकृतींचा समावेश असून, प्रदर्शन ११ नोव्हेंबरपर्यंत खुले राहणार आहे. राजर्र्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोनतळी येथे दरबारी चित्रकार दत्तोबा दळवी यांच्या पुढाकाराने भेट झाली होती. काही वर्षांपूर्वी संशोधनातून ही माहिती पुढे आली. मात्र, या प्रदर्शनाच्या निमित्ताने ही भेट पहिल्यांदाच चित्रबद्ध झाली आहे. यावेळी डॉ. नलिनी भागवत, विजय टिपुगडे, सागर बगाडे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Arrestअटक