शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘शाहू चरित्रग्रंथ’ आता इटालियन भाषेत

By admin | Updated: October 12, 2015 00:28 IST

अ‍ॅलेस्सांड्रा कोन्सोलॅरो करणार अनुवाद : शिवाजी विद्यापीठ-तुरीन विद्यापीठात करार

कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘राजर्षी शाहू चरित्रग्रंथ’ आता इटालियन भाषेत प्रसिद्ध होणार आहे. इटलीतील तुरीन विद्यापीठातील हिंदी विषयातील विदूषी डॉ. अ‍ॅलेस्सांड्रा कोन्सोलॅरो या ग्रंथाचा इटालियन भाषेत अनुवाद करणार आहेत.शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभाग आणि इटलीतील तुरीन विद्यापीठाशी सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत डॉ. अ‍ॅलेस्सांड्रा कोन्सोलॅरो यांनी गेल्या महिन्यात शिवाजी विद्यापीठाला भेट दिली. यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ. पद्मा पाटील यांनी डॉ. जयसिंगराव पवार लिखित आणि हिंदीत अनुवादित केलेला ‘राजर्षी शाहू चरित्रग्रंथ’ दाखविला. हा ग्रंथ पाहून डॉ. कोन्सोलॅरो प्रभावित झाल्या. शिवाय त्यांनी स्वत:हून संबंधित ग्रंथ इटालियन भाषेत अनुवादित करण्याची तयारी दाखविली. तसेच शाहू संशोधन केंद्रात जाऊन डॉ. पवार यांच्याशी शाहूचरित्रावर चर्चा केली. (प्रतिनिधी)महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून आतापर्यंत शाहू चरित्रग्रंथ हिंदी, कन्नड, कोकणी, उर्दू, तेलगू, इंग्रजी व जर्मन भाषांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. गुजराती, सिंधी, रशियन भाषांतील अनुवाद प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. यात आता इटालियन भाषेतील अनुवादाचीही भर पडणार आहे. इटालियन भाषेतील हा ग्रंथ सुमारे तीनशे पानांचा असणार आहे. येत्या वर्षभरात त्याची निर्मिती होईल. त्याचा सर्व खर्च प्रबोधिनीतर्फे केला जाणार आहे.- प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधककोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाला इटलीतील तुरीन विद्यापीठातील हिंदी विषयातील विदूषी डॉ. अ‍ॅलेस्सांड्रा कोन्सोलॅरो यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘शाहू चरित्रग्रंथ’ प्रदान केला. यावेळी शेजारी प्रा. डॉ. पद्मा पाटील उपस्थित होत्या.