शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शाहूभूमी ला ‘सारथी’चे अधिकारी, प्रथमच ३८० जणांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 11:35 IST

या संस्थेत किसान मित्र, कौशल्य विकासदूत, तारादूत (महिला सक्षमीकरण दूत), संत गाडगेबाबा दूत (स्वच्छता व व्यसनमुक्ती दूत), संविधान दूत, सावित्री दूत, इत्यादी विशेष व पथदर्शी प्रकल्प राबविले जातात.

ठळक मुद्देप्रशिक्षणार्थी २७ ला भेट देणार; संग्रहालयासह विविध ठिकाणी भेटी

कोल्हापूर : पुणे येथील ‘सारथी’ या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी असे ३८० जणांचे पथक २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कोल्हापुरातील शाहूभूमीस भेट देणार आहे. या तीन दिवसांच्या अभ्यासदौºयात राजर्षी शाहू महाराजांशी संबंधित संस्था, इमारती, बांधकाम, पुराभिलेखागार विभाग, संग्रहालय, आदी ठिकाणी हे पथक भेट देणार आहे.

‘सारथी’ अर्थात छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अ‍ॅँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थींना राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने संस्थेतील अधिकारी, कर्मचारी आणि संस्थेचा पथदर्शी प्रकल्प असलेल्या ‘तारादूत’मधील प्रशिक्षणार्थी असे ३८० जणांचे जम्बो पथक कोल्हापुरातील शाहूभूमीस भेट देणार आहे. यात राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून ते त्यांचे शैक्षणिक कार्य, सामाजिक काम, संस्था, ज्या ठिकाणी ते राहिले ते स्थान, त्यांनी बांधलेले धरण, कर्तृत्व, आदींची सखोल माहिती हे पथक अभ्यासणार आहे.

या संस्थेत किसान मित्र, कौशल्य विकासदूत, तारादूत (महिला सक्षमीकरण दूत), संत गाडगेबाबा दूत (स्वच्छता व व्यसनमुक्ती दूत), संविधान दूत, सावित्री दूत, इत्यादी विशेष व पथदर्शी प्रकल्प राबविले जातात. त्याच्या प्रशिक्षणाकरिता देशभरातून प्रशिक्षणार्थी येथे येतात आणि प्रशिक्षण घेऊन देशभरात राजर्षी शाहू महाराजांचे कार्य एक प्रकारे पुढे नेतात. त्यामुळे या ठिकाणी काम करणाºया अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना शाहू महाराजांविषयी अधिक व सखोल माहिती मिळावी. या उद्देशाने संस्थेने हा तीनदिवसीय अभ्यासदौरा बुधवारी (दि. २७) ते शुक्रवारी (दि. २९) नोव्हेंबरदरम्यान आयोजित केला आहे.या ठिकाणांना भेटराजर्षींचे जन्मस्थान असलेल्या कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस, नवीन राजवाडा, संग्रहालय, कोल्हापूर पुराभिलेखागार विभाग, टाउन हॉल वस्तुसंग्रहालय, जुना राजवाडा, भवानी मंडप, नर्सरी बाग, पंचगंगा नदीघाट, समाधिस्थळ, मुस्लिम बोर्डिंग, केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग कुस्ती मैदान, मोतीबाग तालीम, राधानगरी धरण, सोनतळी, पन्हाळगड, आदी ठिकाणी हे पथक भेट देऊन तेथील वस्तू, साहित्य, कागदपत्रे यांचा अभ्यास करणार आहे.

 

राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने सुरू झालेल्या या संस्थेतील प्रत्येक घटकाला राजर्षी शाहू महाराजांबद्दल सखोल माहिती व्हावी. विशेषत: देशभरातून प्रशिक्षणासाठी येणाºया प्रशिक्षणार्थींना ते समजणे गरजेचे आहे. म्हणून हा अभ्यासदौरा आयोजित केला आहे.- सपना महाडिक, प्रकल्प संचालक 

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर