शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाध्यक्षपदी शफाअत खान यांची निवड

By admin | Updated: May 3, 2016 00:35 IST

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर : कोल्हापूर येथे २१ आणि २२ मे रोजी होणाऱ्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची निवड केल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक गणी आजरेकर यांनी दिली.मुस्लिम साहित्य चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून मुस्लिम बोर्डिंग, कोल्हापूर यांच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहात मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाला राज्यातून ५०० साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन हे संमेलन अतिशय साधेपणाने पार पाडण्यात येणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात तीन परिसंवाद, मराठी कविसंमेलन, बहुभाषिक कवी संमेलन, गजल मुशायरा याबरोबरच प्रकट मुलाखती आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संमेलनाच्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन, नामवंतांचे छायाचित्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, व्यंगचित्र प्रदर्शन आणि कोल्हापुरी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २०१६ - कार्यकारिणी अशी : गणी आजरेकर निमंत्रक, सदस्य - प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण , बाबामोहम्मद आत्तार , प्रा. आय. जी. शेख , शिराज मुजावर , प्रा. डॉ. रफिक सूरज , एम. बी. शेख, महमदनिसार पठाण , डॉ. असिफ सौदागर , डॉ. सूरज चौगुले, समीर मुजावर (पत्रकार), राजू आत्तार, सिंकंदर जमाल , प्रा. फक्रुद्दीन पटेल सदस्य, नसीम जमादार.