शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन

By admin | Updated: July 23, 2014 23:40 IST

कोल्हापुरातील राजारामपुरीतील शिक्षकावर गुन्हा

कोल्हापूर : येथील राजारामपुरी विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी संशयित शिक्षकावर राजारामपुरी पोलिसांनी आज, बुधवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. संग्राम प्रकाश पाटील (रा. धामोड, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेचे वृत्त पीडित विद्यार्थिनी राहत असलेल्या राजारामपुरी मातंग वसाहतीमध्ये समजताच शंभर ते दीडशे जणांचा जमाव शाळेवर चाल करून गेला. यावेळी संशयित शिक्षक पाटील हा पसार झाला होता. तेथून जमाव राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर आला. या ठिकाणी नराधम शिक्षकास त्वरित अटक करा, अशी मागणी केली. या घटनेमुळे परिसरात तणाव होता. याबाबत पोलिसांनी सांगितले, राजारामपुरी चौथ्या गल्लीमध्ये महापालिकेचे हे विद्यालय आहे. संशयित आरोपी संग्राम पाटील हा अनेक वर्षांपासून याठिकाणी शिक्षक आहे. तो गेल्या चार-पाच दिवसांपासून सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनींना प्रश्नार्थी उत्तर सांगा, असे म्हणून त्यांच्याशी लगट करून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. आजही पीडित विद्यार्थिनीशी त्याने दुपारी अशाच प्रकारे वर्तन केले. हा त्रास सतत झाल्याने त्या विद्यार्थिनीने शाळा सुटल्यानंतर घरी येऊन आई-वडिलांना सांगितले. वडिलांनी परिसरातील नागरिकांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे संतप्त तरुणांसह महिलांनी शाळेकडे धाव घेतली. शाळेत जाऊन त्यांनी शिक्षक पाटील याची चौकशी केली असता तो पसार झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. राजारामपुरीपासून ठिकाणासह धामोडकडे पोलिसांचे पथक तातडीने रवाना केले. राजारामपुरी विद्यालयाच्या दारात जमाव थांबून राहिल्याने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमृत देशमुख अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)