शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेटकडे पोलिसांचे ‘सोयी’ने दुर्लक्ष

By admin | Updated: June 14, 2016 01:01 IST

‘एंट्री’मुळे दलाल बिनधास्त : शहरात वेश्या व्यवसायाची पुन्हा चलती

एकनाथ पाटील --कोल्हापूर --शहरासह उपनगरांत आलिशान फ्लॅट व हॉटेल-लॉजमध्ये राजरोस वेश्या व्यवसाय सुरू आहे.‘एंट्री’ देऊन बिनदिक्कत सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटमुळे दलाल व लॉजमालक समाजात बिनधास्त वावरत आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालविले जाणारे सेक्स रॅकेट खुद्द शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकानेच उघडकीस आणल्याने पोलिस ठाण्यांचा अंधारातील कारभार उजेडात आला आहे. शहरातील अवैध व्यवसायांना हद्दपार करण्याची कामगिरी करणाऱ्या तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दोन वर्षांत मटका, दारू, उपनगरांतील वेश्या व्यवसायांवर कारवाईचा सपाटाच लावला होता; परंतु त्यांच्या बदलीनंतर पुन्हा या व्यवसायांनी तोंड वर काढले आहे. शहरात जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व राजारामपुरी ही चार पोलिस ठाणी आहेत. याठिकाणी गोपनीय विभागासह गुन्हे शाखेचा विभाग स्वतंत्र आहेत. त्यांना आपल्या हद्दीमध्ये विविध लॉजवर, फ्लॅटवर राजरोस सुरू असलेला वेश्या व्यवसाय व सेक्स रॅकेट कसे दिसत नाही? काही पोलिसही आपली भूक याठिकाणी भागवून घेत असल्याची चर्चा आहे. राजारामपुरी, महाद्वार रोड, ताराबाई पार्क, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, आर. के.नगर, रिंग रोड फुलेवाडी, शिरोली, कागल हायवे, आदी ठिकाणी छुप्या मार्गाने आजही सेक्स रॅकेट चालविले जात आहे. या रॅकेटची माहिती पोलिसांना आहे; परंतु चिरीमिरीच्या नावाखाली ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वे स्टेशनमुळे शाहूपुरी व लक्ष्मीपुरी परिसरांत लोकांची नेहमी वर्दळ असते. दोन्ही परिसरांत रोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे बाहेरगावांहून येणारे व्यापारी या परिसरातील लॉजवर उतरतात. त्यामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी याच परिसरात वास्तव्य वाढविले आहे. शाहू, अयोध्या, उषा टॉकीज, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, संभाजी पूल, व्हीनस कॉर्नर चौक, रेल्वे स्टेशन व पोस्ट कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानकासमोरील उड्डाणपूल, परिख पूल, आदी ठिकाणी वेश्या न् येणा-जाणाऱ्यांकडे अश्लील हावभाव करून त्यांना जाळ्यात ओढतात. यातील बऱ्याच वेश्या या रात्रीच्यावेळी मद्यप्राशन करतात. त्यांचे एखाद्या गिऱ्हाइकाशी जोराचे भांडण झाले तर त्याला मारहाण करण्यासही त्या मागे-पुढे पाहत नाहीत. ज्या-त्या हद्दीतील पोलिसांशी असलेल्या ‘सलगी’मुळे त्यांची या परिसरात मोठी दहशत आहे. वेश्यांच्या जोडीला अलीकडील काही दिवसांत तृतीयपंथीयांची स्टेशन रोडवर गर्दी उसळत आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिख पुलाशेजारी हे सगळे चालते; तरीही पोलिस डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळेपणाने कारभार करीत आहेत.केरळ, बांगलादेश ते कोल्हापूर कनेकशनकेरळ, बांगलादेश येथून झटपट पैसा मिळविण्यासाठी चांगली नोकरी देतो, असे सांगून तरुणींना मुंबईमध्ये आणले जाते. तेथून देहविक्रीसाठी तरुणींना कोल्हापुरात आणले जाते. या तरुणी पुरविण्याचे काम मुंबईतील सलीम व पुण्यातील गणेश हे दोघे करीत आहेत. या दोघांवर मुंबई-पुणे पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या कुंटणखान्याचे धागेदोरे कुठेपर्यंत गुंतले आहेत, याची माहितीही पोलीस घेत आहेत. झटपट पैसा मिळविण्यासाठी चांगली नोकरी देतो, असे सांगून तरुणींना आणले जाते. त्यानंतर त्यांना देहविक्रीसाठी भाग पाडले जाते. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापूर पोलिसांना सलीम किंवा गणेशचा मागमूसही लागलेला नाही.