शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार पोलिसांचा ४८ तास खडा पहारा, तमिळनाडू, मध्यप्रदेश परिक्षेत्रातील स्पेशल फोर्स तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:41 IST

लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यरात्रीपर्यंत मतपेट्या जमा केल्यानंतर ‘हुश्श... सुटलो एकदा!’ असे म्हणत बंदोबस्तावरील पोलिसांचे चेहरे आनंदाने खुलले.

ठळक मुद्देपोलिसांचा ४८ तास खडा पहारा तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांचा समावेश

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूरच्या सात हजार पोलिसांनी ४८ तास खडा पहारा देत जिल्ह्यावर नियंत्रण ठेवले. कागल, कदमवाडी, कनाननगर येथे किरकोळ वादावादीचे प्रकार सोडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मध्यरात्रीपर्यंत मतपेट्या जमा केल्यानंतर ‘हुश्श... सुटलो एकदा!’ असे म्हणत बंदोबस्तावरील पोलिसांचे चेहरे आनंदाने खुलले.लोकसभा निवडणूक बंदोबस्ताची तयारी पोलीस प्रशासनाने दोन महिन्यांपासून केली होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कानोसा घेतला होता. या निवडणुकीत पोलीस प्रशासनाने अतिशय अभ्यासपूर्वक नियोजन केले होते.

परराज्यांतून व परजिल्ह्यांतून आलेल्या पोलिसांची गैरसोय होऊ नये, अशी त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय केली होती. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी ३०० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले. अवैध धंद्यांवर छापे टाकून त्या व्यावसायिकांना सळो की पळो करून सोडले. निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच सर्व पोलिसांच्या सुट्या, रजा रद्द केल्या. ४० दिवस पोलीस रात्रंदिवस रस्त्यांवर उतरून बंदोबस्त करीत होते. प्रचारसभा, मिरवणुकीच्या बंदोबस्ताचा पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण होता.निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी तमिळनाडू, मध्यप्रदेशसह कोल्हापूर परिक्षेत्रातील स्पेशल फोर्सचे दोन हजार पोलीस बंदोबस्तासाठी कोल्हापुरात दाखल झाले. रविवारी सकाळी प्रत्येक पोलीस ठाण्यानुसार बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले होते. निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी सुमारे सात हजार पोलीस जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. संवेदनशील मतदारसंघांत पोलिसांची जादा कुमक तैनात केल्याने कोणत्याही गैरप्रकारांना संधी मिळाली नाही.

इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, शाहूवाडी, कोडोली, पन्हाळा, आदी ठिकाणी राज्य राखीव दलाचे जवान तैनात असल्याने वादावादीचे प्रकार घडले नाहीत. मतदान केंद्रावर व परिसरात पोलीस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. खासगी व शासकीय वाहनांतूनही पोलीस पेट्रोलिंग करीत होते. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांसाठी चहा-नाष्टा, जेवणाची सोय स्वतंत्रपणे केली होती. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी दोन महिने पोलिसांनी खूप मेहनत घेतली. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगले