शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनवाडमध्ये नवनिर्वाचित सात सदस्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:37 IST

अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीनंतर सात सदस्यांचा राजीनामा, एक मत फुटल्याने निर्णय व सरपंच निवडीत घोडेबाजार झाल्याचा ...

अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीनंतर सात सदस्यांचा राजीनामा, एक मत फुटल्याने निर्णय व

सरपंच निवडीत घोडेबाजार झाल्याचा आरोप

अर्जुनवाड : अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीवेळी सत्ताधारी राजश्री शाहू विकास आघाडीमधील एक सदस्य फुटल्याने सत्ता गेली. या कारणामुळे १३ पैकी ७ सदस्यांनी आपला राजीनामा ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गंगाई यांच्याकडे दिला आहे. यामध्ये नूतन ग्रा. पं. सदस्य नंदा खोत, संगीता चौगुले, भारती परीट, शोभा डोंगरे, संतोष पाटील, संतोष दुधाळे, परशुराम बागडी यांनी राजीनामा दिला आहे.

अर्जुनवाड ग्रामपंचायतीची सरपंच निवड आज गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी राजर्षी शाहू विकास आघाडीची सदस्य संख्या सात, तर अर्जुनेश्वर विकास आघाडी व अपक्ष अशी सदस्य संख्या सहा आहे. सरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या गुप्त मतदानामध्ये शाहू आघाडीचा एक सदस्य फुटल्याने अर्जुनेश्वर आघाडी व अपक्ष गटाची सत्ता आली आहे. यावेळी सरपंचपदाच्या उमेदवार स्वाती कोळी, उपसरपंचपदाचे उमेदवार विश्‍वनाथ कदम प्रत्येकी सात मते मिळाल्याने त्यांची निवड झाली. शाहू आघाडीतील कोण सदस्य फुटला आहे, हे न कळल्यामुळे आघाडीच्या सात सदस्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेऊन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गंगाई यांच्याकडे राजीनामा दिला. या निर्णयाने अर्जुनवाड गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या निवडणुकीत शाहू आघाडीतील एक सदस्याने गद्दारी केल्याने सत्ता गमवावी लागली; पण राजीनामा दिल्याने मतदारांचा अनादर झाला असल्याची चर्चा होत आहे. याबाबत पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष्य लागले आहे.

चौकट

याबाबत आघाडीप्रमुख यांनी ग्रामपंचायत बरखास्त करून सर्व ताकदीने न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे जाहीर केले आहे, तर उपसरपंचपदाची निवडणूक लढवणारे आघाडीचे उमेदवार संतोष पाटील यांनी या प्रकारात घोडेबाजार झाला असून, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.