शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

इचलकरंजीतील ‘आयजीएम’च्या कर्मचाºयांना सात महिन्यांनी पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:15 IST

इचलकरंजी : शहरातील आयजीएम दवाखान्याकडील ७० अधिकारी व कर्मचाºयांचे गेले सात महिने प्रलंबित असलेले वेतन लवकरच अदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. साधारणत: महिन्याभरात या सर्वांचे वेतन अदा केले जाईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.नगरपालिकेकडे सुरू असलेल्या आयजीएम दवाखान्यापासून वर्षाला दीड ते दोन कोटी रुपये नुकसान होऊ लागल्यामुळे हा दवाखाना ...

ठळक मुद्देमहिन्याभरात रक्कम मिळण्याची अपेक्षा

इचलकरंजी : शहरातील आयजीएम दवाखान्याकडील ७० अधिकारी व कर्मचाºयांचे गेले सात महिने प्रलंबित असलेले वेतन लवकरच अदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. साधारणत: महिन्याभरात या सर्वांचे वेतन अदा केले जाईल, अशी आशा पल्लवित झाली आहे.नगरपालिकेकडे सुरू असलेल्या आयजीएम दवाखान्यापासून वर्षाला दीड ते दोन कोटी रुपये नुकसान होऊ लागल्यामुळे हा दवाखाना शासनाने चालविण्यास घ्यावा, अशी मागणी नगरपालिकेतून केली. नगरपालिकेने सर्वांनुमते केलेला ठराव शासनाकडे पाठविला. पालिकेचा सुमारे ३५० खाटांचा हा दवाखाना शासनाने ताब्यात घ्यावा, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी विशेष प्रयत्न केले. ३० जून २०१६ ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दवाखान्याचे हस्तांतरण शासनाकडे करून घेण्यास मान्यता दिली.

दरम्यान, आयजीएम दवाखान्याबाबत शासनाकडे दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होऊन हा दवाखाना शासनाने ताब्यात घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. यानुसार २७ फेब्रुवारीपासून आयजीएम दवाखान्याचे हस्तांतरण शासनाच्या आरोग्य खात्याकडे केले. त्या दिवशी दवाखान्याकडे डॉ. सुप्रिया देशमुख यांची वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती केली. तर त्याच दिवसापासून बाह्यरुग्ण विभाग व अन्य विभागांकडील कागदपत्रे बदलून शासनाच्या आरोग्य खात्याच्या नावे केली.

आयजीएम दवाखान्याकडे असलेले डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, अन्य तज्ज्ञ कर्मचारी यांच्यापैकी ७० अधिकारी व कर्मचाºयांना शासनाकडे घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये १४ डॉक्टर, २९ परिचारिका, सात वॉर्डबॉय, दोन प्रयोगशाळा तज्ज्ञ, सात मिश्रक, एक दंत चिकित्सा सहायक, एक आहारतज्ज्ञ, तीन सफाई कर्मचारी, एक शिंपी, एक शिपाई, एक आया यांचा समावेश आहे. या सर्वांचे वेतन मार्च २०१७ पर्यंत देण्याची तरतूद नगरपालिकेकडे होती. मात्र, त्यानंतर हे सर्व शासनाच्या सेवेत गेल्यामुळे आरोग्य खात्याकडून या सर्वांचा पगार होणे आवश्यक होते; पण आरोग्य खात्याकडे त्यांच्या पगाराची तरतूद नसल्यामुळे गेले सात महिने या सर्वांना वेतनापासून वंचित राहावे लागले आहे.

अशा पार्श्वभूमीवर आमदार सुरेश हाळवणकर यांनी दवाखान्याकडील सर्व अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन मिळावे, यासाठी शासन दरबारी जोरदार प्रयत्न केले. आता या सर्वांचे वेतन देण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडे तरतूद झाली आहे.या तरतुदीनुसार या सर्वांचे वेतन देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दवाखान्याकडे असलेल्या या सर्वांना राष्टÑीय बॅँकांमध्ये खाते उघडण्यास सांगितले असून, सदरचे खाते आधारकार्ड व पॅनकार्डशी संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी, साधारणत: महिन्याभरात या सर्वांना वेतन मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.आरोग्य विभागाकडील वेतनाबाबत अनभिज्ञनगरपालिकेकडे सदरचे ७० अधिकारी व कर्मचारी असताना त्यांना महिन्याला सुमारे ३० लाख रुपयांचा पगार मिळत असे. मात्र, या सर्वांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात आल्यामुळे आता या सर्वांचे पगार आरोग्य खात्याकडून मिळणार असले तरी त्यांना किती पगार मिळणार, याबाबत हे सर्व अनभिज्ञ आहे. त्यामुळे महिन्याला मिळणारा पगार आणि गेल्या सात महिन्यांचे थकीत वेतन याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.