शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘राधानगरी’चे सात दरवाजे खुले

By admin | Updated: September 25, 2016 01:03 IST

धरणक्षेत्रात पावसाचा जोर : नद्यांची पातळी वाढली

कोल्हापूर : धरणक्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसाने राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे शनिवारी खुले झाले. या पावसाळ्यात हे दरवाजे तिसऱ्यांदा खुले झाले आहेत. ‘काळम्मावाडी’तूनही विसर्ग वाढविण्यात आला असून, नद्यांच्या जलपातळीत कमालीची वाढ झाली आहे. प्रत्येक तासाला पंचगंगेची पातळी चार इंचांनी वाढत आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात विशेषत: पश्चिमेकडील तालुक्यांत चांगला पाऊस सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, शाहूवाडी या तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. शनिवारी सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापूर शहर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यांत पाऊस कमी आहे. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. दुपारी तीननंतर जोरदार सरी कोसळल्या; पण दिवसभर गारवा राहिला. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित सातही दरवाजे शनिवारी खुले झाले. या हंगामात तिसऱ्यांदा हे दरवाजे खुले झाले असून, प्रतिसेकंद ११ हजार ९९६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणक्षेत्रात पाऊस असल्याने सतर्कता म्हणून विसर्ग वाढविण्यात आला असून, प्रतिसेकंद १५ हजार ६०० घनफूट विसर्ग सुरू आहे. विसर्ग जोरात सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता १७.१० फूट होती, सायंकाळी सहापर्यंत ती १९.८ फुटांपर्यंत पोहोचली आहे. दीड महिन्यानंतर दरवाजे उघडले ४राधानगरी : आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने राधानगरी तालुक्यात दोन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. दुपारी साडेबाराला राधानगरी धरणाचे सर्व सातही स्वयंचलित दरवाजे उघडले. दीड महिन्यानंतर यावर्षी दुसऱ्यांदा हे दरवाजे सुरू झाले. सप्टेंबरच्या शेवटी अशाप्रकारे दरवाजे सुरू होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. याद्वारे दहा हजार व दोन्ही वीजनिर्मिर्ती केंद्रातून दोन हजार असा बारा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ४आज सकाळी आठ वाजता येथे ८५ व एकूण ४१३३ मी.मी. पावसाची नोंद झाली. कालपासून दोन स्वयंचलित दरवाजे सुरू होते. सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी चार व पाच क्रमांकाचे, साडेअकरा वाजता सातवा व साडेबाराला पहिला व दुसरा दरवाजा उघडला गेला. ‘पाटगाव’ भरले! पाटगाव धरणक्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप हे धरण भरले नव्हते. गेले तीन-चार दिवस चांगला पाऊस सुरू असल्याने शनिवारी दुपारी साडेचार वाजता धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची क्षमता ३.७१६ टी. एम.सी. इतकी आहे. तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा हातकणंगले- ०.६३, शिरोळ- १.५७, पन्हाळा- ३.७१, शाहूवाडी- ८, राधानगरी- २५, गगनबावडा- ५३.५०, करवीर- २.१८, कागल- २.७१, गडहिंग्लज- ३.१०, भुदरगड- १५, आजरा- १०.५०, चंदगड- ११.३३. वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग शित्तूर-वारूण : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. धरणाच्या जलाशयात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धरण व्यवस्थापनाने चार दरवाजांतून ११,४४५ क्युसेक तर विद्युत निर्मितीसाठी १५५५ क्युसेक असे एकूण १३,००० क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडले आहे. काळम्मावाडी परिसरात धुवाधार ४सोळांकूर : काळम्मावाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने, धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणातून प्रतिसेकंद ११ हजार क्युसेक दाबाने पाणी जलविद्युत केंद्र व धरणाच्या सांडव्यातून दूधगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दूधगंगा नदीपात्रातील पातळीत वाढ झाल्याने रात्रीपर्यंत काही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. ४शनिवारी (दि. २४) दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. आजअखेर २८३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाण्याची पातळी ६४६.२९ मी. असून, पाणी साठा ७३००२४ द.ल.घ.मी. इतका आहे. धरण १०१.४५ टक्के म्हणजे २५७७ टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. जलविद्युत केंद्रातून १६०० क्युसेक दाबाने, तर सांडव्यावरून ९४५० क्युसेक दाबाने पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत २०१३ व यावर्षी पावसाची नोंद अधिक झाली आहे. ४सन २०१३ साली ३४०५ मिमी पावसाची नोंद असून, त्याखालोखाल सन २०१६ साली २८३५ मिमी पावसाची नोंद आहे; मात्र यावर्षीचा सांडव्यावरील विसर्ग हा गतसालापेक्षा जास्त आहे.