शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील ‘फुकट्यां’ना सात कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:35 IST

प्रदीप शिंदे । कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेत, तिकीट तपासनिसाची नजर चुकवून रेल्वेतून विनातिकीट प्रवास करताना एक लाख २८ ...

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : गर्दीचा फायदा घेत, तिकीट तपासनिसाची नजर चुकवून रेल्वेतून विनातिकीट प्रवास करताना एक लाख २८ हजार लोकांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत सात कोटी १७ लाख रुपयांचा दंड आकारला.वेळेत आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रवाशांकडून पहिली पसंती दिली जाते. त्यामुळे वर्षाकाठी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कोटींमध्ये आहे. काही मार्गांवरील ठरावीक गाड्यांना नेहमीच गर्दी असते. त्याचा फायदा घेत, तिकीट तपासनिसांची नजर चुकवून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. मुख्यत: कमी अंतराच्या व कमी तिकिटाच्या प्रवासातच तिकीट न घेता प्रवास करण्याची मानसिकता जास्त आहे. गर्दीत हळूच बाकावर जाऊन बसणे, तिकीट तपासनीस आल्यावर दुसºया डब्यात जाणे, स्टेशन आल्यावर तत्काळ खाली उतरणे असे प्रकार करून तिकीट चुकविले जाते. हे प्रकार रोखण्यासाठी पुणे विभागाने विशेष मोहीम राबविली.मिरज-कोल्हापूर, पुणे-मिरज, पुणे-मलवली आणि पुणे-बारामती अशा मंडलअंतर्गत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विभागात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यांत एकूण दोन लाख ७६ हजार ८०० विविध प्रकरणांमध्ये दंड म्हणून १४ कोटी ३९ लाख रुपयांहून अधिकची वसुली झाली. यापैकी एक लाख २८ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना आढळले आहेत, ज्यातून सात कोटी १७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. उपविभागीय रेल्वे प्रबंधक, अप्पर मंडल रेल्वे प्रबंधकांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, विभागीय वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन, साहाय्यक वाणिज्य प्रबंधक एस. व्ही. सुभाष यांच्या निरीक्षणाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे संरक्षण दलाच्या सहकार्याने ही तपासणी मोहीम राबविली.गेल्यावर्षीपेक्षा दंडात १५ टक्क्यांनी वाढपुणे विभागाकडून मागील वर्षाच्या याच कालावधीत दोन लाख ५० हजार प्रकरणांत १२ कोटी २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यामध्ये एक लाख १३ हजार लोक विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले होते. त्यांच्याकडून सहा कोटी २४ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल झाला होता. विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केलेल्या दंडाच्या एकूण रकमेमध्ये दंडात १५ टक्के वाढ झाली. तसेच विनातिकीट प्रवास करणाºया संख्येत १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसून आले आहे.प्रशासनाकडून तिकीट तपासणी नियमितपणे सुरू असते. गेल्या नऊ महिन्यांत एक लाख २८ हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करताना आढळल्यास संबंधित प्रवाशाला आर्थिक दंड व मानहानीस सामोरे जावे लागते. कायद्यांतर्गत दंड भरावा लागतो आणि पैसे न दिल्यास त्यांना तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग.