शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यादवनगरातील सशस्त्र हल्लाप्रकरणी सात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

कोल्हापूर : एकमेकांना खुन्नस देण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या सशस्त्र हाणामारीत पाच जण जखमी झाले. ही घटना यादवनगरात घडली. ...

कोल्हापूर : एकमेकांना खुन्नस देण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या सशस्त्र हाणामारीत पाच जण जखमी झाले. ही घटना यादवनगरात घडली. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. शनिवारी रात्री दोन्ही गटांतील सात जणांना अटक केली.

अटक केलेल्यांची नावे अशी : अमन मुबारक शेख (वय २९), सुहेल गनी मोमीन (२४), मधुकर प्रकाश दिंडे (४६), मंदार मधुकर दिंडे (२१), युवराज तुकाराम व्हल्लार-पाटील (३७ सर्व रा. यादवनगर). तसेच प्रथम जानकर, गौरव जानकर (दोघेही रा. यादवनगर).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यादवनगरातील अमन शेख हा आपल्या मित्रासोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी प्रदीप जानकर व मित्र अनिकेत साळुंखे हे दुचाकीवरून तिथून जात होते. त्यांच्यात एकमेकांकडे बघण्याच्या आणि खुन्नस देण्यावरून वादाची ठिणगी पडली. वाद उफाळला आणि अमन शेख, सोहिल मोमीन, शकील जमादार यांच्यासह १० ते १२ जणांनी चाकू आणि एडक्यासारख्या धारदार शस्त्राने जानकर आणि साळुंकेवर हल्ला केला. या हल्ल्यात ते दोघे जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

दरम्यान, अमन शेख यांच्या तक्रारीनुसार प्रथम जानकर, गौरव जानकर, आश्विन शेळके यांच्यासह आठ जणांनी तलवार, चाकू आणि बांबूच्या सहाय्याने हल्ला करून अमन शेख, त्याची आई आणि मावशी यांना जखमी केल्याची तक्रार पोलिसांत दिली. याप्रकरणी दोन्ही गटातील सात जणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.