शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये १०० घरे साकारणार

By admin | Updated: April 28, 2015 23:46 IST

रमाई आवास योजना : कागल नगरपालिकेला नव्याने दीड कोटींचा निधी मंजूर

कागल : राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेसाठी कागल नगरपालिकेला नव्याने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, शंभरजणांना घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांचे रोख अनुदान मिळणार आहे. यापूर्वी कागल नगरपरिषदेने २०११-२०१२ मध्ये ६७ लाख रुपये, २०१२-२०१३ साठी एक कोटी ६३ लाख इतका निधी १६४ जणांना दिला आहे. या योजनेची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करणारी कागल नगरपरिषद राज्यात एकमेव ठरली आहे.अनुसूचित जाती-जमातीमधील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना हे अनुदान मिळते. जातीचा दाखला, दारिद्र्यरेषेखाली नाव आणि प्रॉपर्टी कार्ड या कागदपत्रांवर घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून रोख दीड लाख रुपये मिळतात. कागल शहरात जवळपास ३०० दलित कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यापैकी १६४ जणांना यापूर्वी हे अनुदान मिळाले आहे. आता सन २०१४-२०१५ साठी दीड कोटी रुपये म्हणजे १०० कुटुंबांना प्रत्येकी दीड लाख रुपये घर बांधण्यासाठी मिळणार आहेत. या योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अनुदान मिळाल्यानंतर दारिद्र्यरेषेवरीलही कुटुंबांचा विचार यासाठी करता येतो. मात्र, त्यासाठी दारिद्र्यरेषेखालील एकही लाभार्थी शिल्लक राहिलेला नसला पाहिजे. दीड लाख रुपयांचे हे अनुदान विना-परतावा आहे. या दीड लाखांत अथवा त्यामध्ये आपली रक्कम घालून लाभार्थ्यांना आपले घर बांधता येते. येथील आंबेडकरनगर, बेघर वसाहत, मातंग वसाहत या ठिकाणी टुमुकदार अशी घरे या योजनेतून साकारली आहेत.नगरपालिका कर्मचाऱ्यांची गृहनिर्माण संस्थाशाहू कॉलनीजवळ कारखाना रस्त्याजवळ कागल नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी दोन एकर जागा राखीव आहे. एकूण ८८ सभासदांपैकी ४४ सभासद हे सफाई कर्मचारी आहेत. लवकरच यांचेही काम सुरू होणार आहे. ‘१ मे’ रोजी फलक अनावरण सोहळा होणार आहे.