शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एमबीए सीईटी’ परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप

By संदीप आडनाईक | Updated: March 26, 2023 00:23 IST

एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शनिवारी कोल्हापुरात घेण्यात आलेल्या ‘एमएएच एमबीए सीईटी’ परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

कोल्हापूर :

एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शनिवारी कोल्हापुरात घेण्यात आलेल्या ‘एमएएच एमबीए सीईटी’ परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता ‘एमएएच एमबीए सीईटी’परीक्षा शनिवारी झाली. सीईटी सेलतर्फे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शनिवारी (ता.२५) आणि रविवारी (ता.२६) सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे.

ही परीक्षा सकाळी नऊ ते साडे अकरा आणि दुपारी दोन ते साडे चार अशा सत्रात होत आहे. शनिवारी परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन असणे, परीक्षेचा नियोजित कालावधी मागे-पुढे होणे, नियोजित वेळेपूर्वीच परीक्षेचे सर्व्हर बंद होणे, अशा असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना या विद्यार्थ्यांना करावा लागला. कोल्हापूर जिल्ह्यातील तीन परीक्षा केंद्रावर हा गोंधळ झाला आहे. दरम्यान, या तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेतील पेपर सोडविण्यासाठी १५० मिनिटे, तर काही विद्यार्थ्यांना १८० मिनिटे मिळाली. परिणामी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.कोल्हापुरातील न्यू पॉलिटेक्निक, प्रयाग चिखली आणि वाठार येथील अशोकराव माने पॉलिटेक्निक इन्स्टिट्युट या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी साडे नऊ वाजता होणारी ही परीक्षा उशिरा सुरू झाल्याने आमची परीक्षा दोन वाजता नियोजित वेळेत सुरू झाली नाही. १२ वाजता रिपोर्टिंग टाईम असताना दोन वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला प्रत्यक्ष पेपर चार वाजता सुरू झाला आणि साडेसात वाजता संपला. आम्हाला १५० मिनिटांचा वेळ मिळाला सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मात्र १८० मिनिटे ज्यादा देण्यात आली.-अक्षय ढाले , विद्यार्थी, देवकर पाणंद, कोल्हापूर. आम्हाला उचगाव येथील न्यू पॉलिटेक्निक हे केंद्र मिळाले होते. बारा वाजता रिपोर्टिंग टाईम दिला होता, मात्र आमची प्रत्यक्ष परीक्षा चार वाजता सुरू झाली, ती साडेसात वाजेपर्यंत सुरू राहिली. १५० मिनिटाचाच वेळ मिळाला. याशिवाय खराब स्क्रीनचा कॉम्प्युटर आणि माऊस दिल्यामुळे उत्तरे द्यायला वेळ लागत होता.-श्रेयस निकम, विद्यार्थी, राजारामपुरी, कोल्हापूर.