शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करा

By admin | Updated: November 18, 2014 23:25 IST

‘अवनि’ची मागणी : जिल्हा परिषदेच्या शाळेत सामावून घ्या

कोल्हापूर : जिल्ह्यातील या शैक्षणिक वर्षात वीटभट्टी, ऊसतोड कामगार, खाणकाम आदी कामगारांच्या शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करा, यांसह विविध मागण्यांचे निवेदन आज, मंगळवारी ‘अवनि’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांना दिले. ‘अवनि’ गेल्या वीस वर्षांपासून कोल्हापुरात शाळाबाह्य मुले, बालमजूर तसेच गरीब वंचित व निराधार मुला-मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. कष्टकरी, कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून या संस्थेने ३४ वाड्या-वस्त्यांवर शाळाबाह्य मुलांसाठी शाळा चालवल्या. या माध्यमातून संस्थेने तीन हजार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पण अजूनही वीटभट्ट्या, ऊसतोड कामगारांची मुले शाळाबाह्य आहेत. या मुलांचा सर्व्हे करून त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सहभागी करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली. यावेळी साताप्पा मोहिते, अमर कांबळे, अमोल कवाळे, गोपाळ पटवर्धन, सुलभा माने, सुनीता भोसले, पुष्पा शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अन्य मागण्या अशा...उदगाव, चिंचवाड, कोथळी, वाकरे, खुपिरे, दोनवडे, सरनोबतवाडी, कोपार्डे वीटभट्टीवरील ३ ते ५ वयोगटांतील मुलांसाठी अंगणवाडी सुरू करावी. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कारखाना कार्यस्थळावर अंगणवाडी सुरू करून त्यांना गणवेश द्यावा.वीटभट्टी, ऊसतोड कामगार व खाणकाम कामगार यांच्या गरोदर व स्तनदा मातांचा सर्व्हे करून त्यांना पूरक आहार द्यावास्थलांतरित ठिकाणावरील ० ते ५ वयोगटांतील मुलांची आरोग्य तपासणी करावी.येथील मुलांसाठी पाळणाघर सुरू करावे. जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांना देताना ‘अवनि’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले, साताप्पा मोहिते, सुलभा माने, सुनीता भोसले आदी.