शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

खूनाच्या खटल्यात आरोपीला शिक्षा

By admin | Updated: April 25, 2017 17:25 IST

वाठार तर्फ वडगाव येथील घटना

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर दि. २५: वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे पत्नीशी प्रेमसंबध असल्याच्या संशयातून शरीफ ईकबाल पटाईत (वय ३५) याच्या खून प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी आरोपी बालम गुलाब पठाण (३५) याला तीन वर्षाची शिक्षा व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली. दंडातील ३० हजार रुपये मृताचे पत्नी व लहान मुलगा यांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. अधिक माहिती अशी, शरीफ पटाईत व त्यांचा भाऊ रमजान पटाईत यांनी वाठार येथील नवीन घराचे बांधकाम २०१४ मध्ये आरोपीचे वडील गुलाब बाळू पठाण (रा. पोखले, ता. पन्हाळा) यांना दिले होते. यातून बालम व शरीफ यांची ओळख झाली. त्यानंतर काही महिन्यांनी घराच्या बांधकामाच्या आर्थिक व्यवहारातून पठाण व पटाईत या दोन्ही कुटूंबात वाद झाला.याच मुदतीत शरीफ हा बालमच्या पत्नीचे मोबाईलवर मिस कॉल, फोन करीत असे. ही गोष्ट बालमच्या लक्षात आली. त्याने आपल्या मोबाईलवरुन पत्नीला बोलायला लावून शरीफ हा प्रेमसंबधाने बोलत असल्याची खात्री केली. हे संभाषण मेमरी कार्डवर रेकॉर्डिंग केले. दि. १ जून २०१५ रोजी दूपारी दीडच्या सुमारास बालम हा दूचाकीवरुन शरीफ याचे घरी जाब विचारण्यासाठी आला. याठिकाणी दोघांच्यात बाचाबाची झाली.बालम याने शरीफ याचे डोके घरातील सिमेंटचे चौकटीवर आपटून त्यास गंभीर जखमी केले. त्यामध्ये शरीफ याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत शरीफचा भाऊ रमजान पटाईत यांनी वडगांव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे आरोपी बालम याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. तत्कालीन परिविक्षा सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधिश कुलकर्णी यांचेसमोर झाली. सहायक सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी गुन्हा सिध्द करण्यासाठी नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृताची पत्नी, फिर्यादी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष ग्राह्य मानूण आरोपीला शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)