शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी सेवानिवृत्तांची संवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:44 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सेवानिवृत्त झाल्यानंतर ‘मी व माझं घर’ एवढ्याच वर्तुळात फिरत राहणाऱ्यांच्या भूमिकेला ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सेवानिवृत्त झाल्यानंतर ‘मी व माझं घर’ एवढ्याच वर्तुळात फिरत राहणाऱ्यांच्या भूमिकेला छेद देत कोल्हापुरातील काही सेवानिवृत्तांनी वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी आपली कृतिशील संवेदनशीलता दाखवून दिली आहे. संजय कात्रे, प्रसाद चौगुले, सुहास नाईक, शिरीष पुजारी या चौघा मित्रांनी कोल्हापुरातील रस्त्यांच्या डिव्हायडरना रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम हाती घेतली आहे.संजय कात्रे हे कॉमर्स कॉलेजचे माजी विद्यार्थी. बॅँक आॅफ इंडियात नोकरी करीत होते. त्यांनी बॅँकेतर्फे न्यूयॉर्क येथेही चार वर्षे सेवा केली. मुंबईत त्यांनी व्यवसायही सुरू केला होता. मात्र, घरगुती अडचणीमुळे ते २०१५ साली कोल्हापुरात परत आले. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, डिव्हायडरवरील रिफ्लेक्टरअभावी काही ठिकाणी अपघात झाले आहेत, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. रात्रीच्या वेळीही समोरच्या वाहनांच्या दिव्यांचाही त्रास वाहनधारकांना होतो.कात्रे यांनी याबाबत पोलीस खात्यावर आणि प्रशासनावर अवलंबून न राहता आपण पुढाकार घेतला. त्यांचेच वर्गमित्र उद्योजक प्रसाद चौगुले, महाराष्ट्र बॅँकेतून सेवानिवृत्त झालेले सुहास नाईक, शिरीष पुजारी यांनी आपल्या मित्राला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि मार्च महिन्यापासून या सर्वांनी शहरातील डिव्हायडरना रिफ्लेक्टर लावण्याच्या कामाला सुरुवात केली. कात्रे यांनी स्वत: आॅनलाईन रिफ्लेक्टर मागविले आणि आता मुंबईतून त्यांनी आतापर्यंत १५ हजारांहून अधिक किमतीचे रिफ्लेक्टर मागवून घेतले असून, ते लावण्याचे काम सुरू आहे.रोज सकाळी तास दीड तास हे मित्र काम करीत असून, अनेकांना त्यांचे कौतुक वाटत आहे. काहींनी त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली असून, काहींनी आर्थिक मदतही देऊ केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असताना कात्रे व मित्रांनी घेतलेली ही भूमिका अनुकरणीय आहे, यात शंका नाही. या कामामध्ये आता डॉ. सुनील पाटील, मिलिंद गडकरी यांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे.सहभागाचे आवाहनया उपक्रमामध्ये ज्या नागरिकांना प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी व्हायचे असेल अशांनी संजय कात्रे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेआहे.