शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचा संतवचनांना काळिमा : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:07 IST

बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर ...

बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर यांच्या वचनांना काळिमा फासला आहे. यासाठी कर्नाटक सरकारचा त्यांच्याच भूमीत ठामपणे उभे राहून मी जाहीर निषेध करतो, असे परखड मत इदलहोंड (ता. खानापूर, जि.बेळगाव) येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी रविवारी व्यक्त केले.इदलहोंड येथे रविवारी गुंफण सद्भावना साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस होते. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून बेळगाव पोलीस प्रशासनाने इदलहोंड येथील साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या सहभागावर बंदी घातली. या पार्श्वभूमीवर सबनीस यांनी खानापूर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच सबनीस यांनी इदलहोंड येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे खानापूरयेथूनच उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.कर्नाटकच्या चुकीच्या कृतीने शांततेला धक्कासबनीस म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधव मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचे संवर्धनासाठी झटत आहेत. यामुळेच मी आनंदाने संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले. तथापि कर्नाटक सरकारने दडपशाही करून आम्हाला संमेलनस्थळी जाऊ दिले नाही. कर्नाटक सरकारच्या या चुकीच्या कृतीमुळे शांततेला धक्का लागला आहे. सबनीस म्हणाले, आमचे मराठीवरील प्रेम कानडीच्या द्वेषावर अवलंबून नाही. कानडी ही आमची भगिनी भाषा आहे.साहित्य वादासाठी नव्हे, संवादासाठी : बागवेबेळगाव : वेदना असल्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही, हे साहित्य वादासाठी नाही, तर संवादासाठी आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी अशोक बागवे यांनी केले. कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथील बलभीम साहित्य अकादमीतर्फे रविवारी आयोजित १४व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बागवे बोलत होते.कुद्रेमनी(जि.बेळगाव) येथील मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अशोक बागवे उपस्थित होते.