शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बन्ने यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:32 IST

गडहिंग्लज : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व देवदासी चळवळीतील बिनीचे शिलेदार, गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष प्रा. विठ्ठल सिद्धाप्पा बन्ने (वय ८७) ...

गडहिंग्लज : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व देवदासी चळवळीतील बिनीचे शिलेदार, गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष प्रा. विठ्ठल सिद्धाप्पा बन्ने (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.प्रा. बन्ने हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास गडहिंग्लज येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहरातील मुख्य मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. येथील अहिल्यादेवी होळकर चौकात नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी बारा वाजता हिरण्यकेशी नदीघाटावरील वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजन गवस, प्रा. किसनराव कुराडे, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले. प्रा. बन्ने यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. कोल्हापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांचा राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी परिवाराशी संबंध आला. सुरुवातीला काहीकाळ गोव्यात आणि त्यानंतर गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख म्हणून काम केले. दरम्यान, देवदासी, कोल्हाटी-डोंबारी, धनगर समाजासह उपेक्षित आणि वंचितांच्या विविध प्रश्नांसाठी हयातभर संघर्ष केला. राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, अंधश्रद्धा निर्मूलन, आदींसह विविध सामाजिक चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते.सुरुवातीला काही वर्षे त्यांनी माजी आमदार शिंदे यांच्यासोबत जनता पक्ष, जनता दल आणि त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्याबरोबर राष्ट्रवादीत काम केले. गडहिंग्लजमधून सुरू झालेल्या चळवळीमुळे देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसनासाठी महाराष्ट्र सरकारने अभ्यासगट नेमला होता. त्याचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. चळवळीमुळे देवदासी प्रथा बंद झाली. परंतु, कायदा होऊनही देवदासींचे पुनर्वसन होत नसल्याने ते व्यथित होते.गडहिंग्लज येथे देवदासी मुलांचे वसतिगृह सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. येथील साधना शिक्षण संस्था व भैरव शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून ते काम पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगराध्यक्षा अनुपमा, मुलगा सिद्धार्थ, मुलगी स्नेहल, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (दि. २१) सकाळी नऊ वाजता आहे.