शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुलपतींना रोज पत्रे पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:44 IST

कोल्हापूर : राज्यातील सहायक प्राध्यापकपदाच्या भरतीवरील बंदी उठविण्यासाठी नेट-सेट, पीएच.डी. पदवीधारक आणि पात्रताधारकांकडून आता थेट कुलपतींना विनंती केली जात आहे. पात्रताधारकांनी पुकारलेल्या आंदोलनातील एक टप्पा म्हणून ही पत्रे (पोस्टकार्ड) पाठविली आहेत.राज्यात ९५११ सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. गेल्या सहा वर्षांपासून सहायक प्राध्यापकांच्या रिक्तपदांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. सीएचबीधारक हे ...

कोल्हापूर : राज्यातील सहायक प्राध्यापकपदाच्या भरतीवरील बंदी उठविण्यासाठी नेट-सेट, पीएच.डी. पदवीधारक आणि पात्रताधारकांकडून आता थेट कुलपतींना विनंती केली जात आहे. पात्रताधारकांनी पुकारलेल्या आंदोलनातील एक टप्पा म्हणून ही पत्रे (पोस्टकार्ड) पाठविली आहेत.राज्यात ९५११ सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. गेल्या सहा वर्षांपासून सहायक प्राध्यापकांच्या रिक्तपदांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. सीएचबीधारक हे भविष्यात कायमस्वरूपी नोकरी मिळेल, या आशेवर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहे. मात्र, रिक्त पदे भरण्याचे शासनाचे वेळकाढू धोरण आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात राज्यातील संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र सेट-नेट, पीएच.डी. पात्रताधारक संघटनेतर्फे आता सहायक प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविण्यासाठी कुलपतींना पत्रे पाठविण्याची विनंती करणार आहेत. राज्यातून साडेतीन हजार पत्रे पाठविण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.कोल्हापुरातून रोज ४० पत्रे पाठविणारपात्रताधारक आणि सीएचबीधारकांची सद्य:स्थिती पाहता सहायक प्राध्यापकांच्या पदभरतीवरील बंदी उठविणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, त्यादृष्टीने शासन आणि सरकारकडून काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे आम्ही राज्यभरात आंदोलन पुकारले आहे, असे महाराष्ट्र सेट-नेट, पीएच.डी., पात्रताधारक संघटनेचे कोल्हापूर समन्वयक डॉ. किशोर खिलारे यांनी सांगितले. ते म्हणाले, याअंतर्गत कुलपतींना पत्रे पाठवून भरती बंदी उठवावी. सहायक प्राध्यापकपदाची भरती सुरू करून आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी केली आहे. कोल्हापुरातून रोज ४० पत्रे पाठविण्यात येणार आहेत.