इचलकरंजी : लोकसंख्येच्या प्रसन्न हा केवळ संख्यात्मक पातळीवर विचारात न घेता असलेल्या लोकसंख्येला गुणात्मक पातळीवर पुढे कसा नेता येईल, याचा विचार केला पाहिजे. जगण्याच्या हक्काची चर्चा करत असताना जगण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या बाबी पुरेशा प्रमाणात सर्व लोकांना मिळाव्यात. आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक धोरणे आखणे आणि त्याची कटाक्षाने अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.
जागतिक लोकसंख्या दिन आणि महाकवी कालिदास दिन यानिमित्त 'लोकसंख्येचा गुणात्मक दृष्टिकोन' या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले होते. सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत केले. चर्चेत अशोक केसरकर, तुकाराम अपराध, दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे, महालिंग कोळेकर, मनोहर जोशी यांनी सहभाग घेतला. यावेळी देवदत्त कुंभार, शकील मुल्ला, नारायण लोटके, अशोक माने, आदी उपस्थित होते.