शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘बालगोपाल’ उपांत्य फेरीत

By admin | Updated: March 3, 2016 00:45 IST

अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धा : ‘साईनाथ’चा ३-१ ने पराभव

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळाने साईनाथ स्पोर्टस्वर ३-१ अशी सहज मात करीत अस्मिता फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सामन्यात ऋतुराज पाटील, रोहित कुरणे, अशिष कुरणे यांनी चमकदार कामगिरी केली. शाहू स्टेडियम येथे बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रारंभापासून बालगोपाल संघाचे वर्चस्व राहिले. बालगोपालकडून सूरज जाधव, सचिन गायकवाड, अजित पोवार, आकाश भोसले, जयकुमार पाटील यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. १५ व्या मिनिटास बालगोपालच्या सूरज जाधवच्या पासवर ऋतुराज पाटील याने गोल करीत सामन्यात आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. साईनाथकडून नीलेश साळोखे, ऋषिकेश पाटील, अभिजित चौगले, प्रसाद पाटील, निखिल तिबिले, ओंकार खोत यांनी सामन्यात बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. ३५ व्या मिनिटास अशिष कुरणे याने गोल नोंदवीत आघाडी २-० अशी केली. उत्तरार्धात बालगोपाल संघ आघाडी वाढविण्याच्या हेतूने, तर साईनाथ संघ सामन्यात बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला. ४८ व्या मिनिटास बालगोपालच्या सूरज जाधवच्या पासवर रोहित कुरणेने गोल नोंदवीत आपल्या संघाची ३-० अशी आघाडी वाढविली. ७२ व्या मिनिटास बालगोपाल संघाच्या पेनल्टी क्षेत्रात गोलरक्षक अक्षय कुरणे याने साईनाथचा आघाडीवीर ऋषिकेश पाटील याला धोकादायकरीत्या अडविले. याबद्दल मुख्य पंचांनी साईनाथ संघास पेनल्टी बहाल केली. यावर ऋषिकेश पाटीलने गोल नोंदवीत सामन्यात ३-१ने आघाडी कमी केली. अखेरपर्यंत बालगोपाल संघाकडून सामन्यावर वर्चस्व राहिल्याने सामना बालगोपाल संघाने ३-१ असा जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. (प्रतिनिधी)