शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

स्व:भान आणि समाजभान नाटकांमधूनच येते

By admin | Updated: December 21, 2016 22:31 IST

अतुल पेठे यांचे प्रतिपादन : सोशल मीडियाच्या अतिरिक्त प्रभावामुळे सांस्कृतिक दारिद्र्य वाढते

गडहिंग्लज : स्वत: ला पाहता येण्याची कला नाटकातच आहे. त्यामुळे नाटक ही कलावंत आणि प्रेक्षक दोघांचीही गरज आहे. वस्तुस्थितीचे भान देणारा सोंगाड्याही नाटकात महत्त्वाचा आहे. किंबहुना, नाटकातच जीवन असून, खरे स्व:भान आणि समाजभान नाटकातूनच येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी केले.गडहिंग्लज पालिकेच्या पू. साने गुरुजी वाचनालयातर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘नाटक आणि जीवन’ या विषयावर त्यांनी तिसरे पुष्प गुंफले. ‘कला, साहित्य व नाटक’ याचा परस्परसंबंध विविध उदाहरणांतून त्यांनी स्पष्ट केला. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अकबर मुल्ला होेते.यावेळी पेठे म्हणाले, दूरदर्शन, मोबाईल, व्हाटस् अ‍ॅप व फेसबुकच्या अतिरिक्त प्रभावामुळे माणूस भासमय विश्वात वावरत आहे. त्यामुळेच सांस्कृतिक दारिद्र्य वाढते आहे, ते कमी होण्यासाठी चांगली पुस्तके वाचणे, चांगली नाटके पाहण्याची गरज आहे.नाटक हे अभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे. नाटकात जिवंतपणा असतो. त्यातून ताकद मिळते. माणसाची दृष्टी विस्तारते. सकारात्मकता व सृजनशीलतेचा विकास होतो. त्यासाठीच नाटक पाहायला हवे. कला माणसाला अंतर्मुख व्हायला लावते, विचार करायला लावते, सुसंस्कृत बनविते. धर्म-जातीच्या भिंती तोडते. बुद्धी आणि राज्यसत्तेलाही हलविण्याची ताकद नाटकात आहे, म्हणूनच शाहिरी व नाटकांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठी क्रांती झाली.मात्र, आज दूरदर्शनच्या आहारी गेल्यामुळे माणसाची दृष्टी प्रदूषित झाली असून, भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, सत्ता राखायची असेल तर मराठी भाषा चांगली आलीच पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.यावेळी माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्यासह आजी-माजी नरसेवक व नागरिक उपस्थित होते. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजश्री कोले यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक दीपक कुराडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘बाप’ जोतिराव.. ‘आई’ सावित्रीबाई !आजकाल जाती-धर्माचा अभिमान सांगून प्रौढी मिरविली जात आहे. मात्र, आपला खरा बाप जोतिराव फुले आणि खरी आई सावित्रीबाईच आहे. ‘माणूस’ ही आपली जात आणि ‘माणुसकी’ हाच आपला धर्म आहे. अंधश्रद्धेच्या जोखडातून माणसांची व समाजाची मुक्ती करणारे दाभोळकर आणि हयातभर श्रमिक-कष्टकऱ्यांसाठी झगडलेले पानसरे हेच आपले खरे नातेवाईक आहेत, असे अभिमानाने सांगायला हवे. मात्र, तसे सांगणारे कमी आहेत. त्यामुळे ४० महिने उलटले तरी दाभोळकरांचे खुनी सापडत नाहीत, अशी खंत पेठे यांनी यावेळी व्यक्त केली.साने गुुुरुजीलोकशिक्षणव्याख्यानमाला