इचलकरंजी : येथील डीकेटीई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील चार विद्यार्थ्यांची अमेरिका, इटली, आयर्लंड व ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांमध्ये निवड झाली आहे. हे विद्यार्थी टोफेल जीआरई व आयएलटीएस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले असून, त्यानुसार त्यांची निवड निरनिराळ्या परदेशातील विद्यापीठांमध्ये झाली आहे.
अपूर्वा पिसे हिची युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अमेरिका येथे एमएससाठी, पवन सावलानी याची एम.एसी. क्लाऊड कॉप्युटिंगसाठी डुब्लीन सिटी युनिव्हर्सिटी आयर्लंड येथे, शुभम चौगुले याची एम.एस.इन डाटा अॅनॅलेटिक्स, आर.एम.आय.टी. युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया येथे, तर दर्शिता जोशी हिची मास्टरर्स इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटसाठी कॅटोलिका युनिव्हर्सिटी, इटली येथे निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, आर. व्ही. केतकर यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले व प्रा. डॉ. डी. व्ही. कोदवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
(फोटो) २८१२२०२०-आयसीएच-०१ (अपूर्वा पिसे) २८१२२०२०-आयसीएच-०२ (पवन सावलानी) २८१२२०२०-आयसीएच-०३ (शुभम चौगुले) २८१२२०२०-आयसीएच-०४ (दर्शिता जोशी)