शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नव्हे वाहन जप्तीमुळे वर्दळ रोडावली, शहरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 12:00 IST

: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीसुद्धा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यावर पोलीस व महापालिका प्रशासनाने नामी शक्कल लढवत वाहन जप्तीसह रॅपिड ॲंटिजेन टेस्ट सुरू केली आहे. या भीतीपोटी रस्त्यावरील वर्दळच कमी झाली आहे.

ठळक मुद्देकोरोना नव्हे वाहन जप्तीमुळे वर्दळ रोडावलीअनेकांनी घेतली ॲंटिजेन टेस्टची धास्ती

कोल्हापूर : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीसुद्धा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यावर पोलीस व महापालिका प्रशासनाने नामी शक्कल लढवत वाहन जप्तीसह रॅपिड ॲंटिजेन टेस्ट सुरू केली आहे. या भीतीपोटी रस्त्यावरील वर्दळच कमी झाली आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून अन्य सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा गेल्या चार दिवसांत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली होती. विशेषत: १६ ते ३० वयोगटातील तरुणाईचा अधिक सहभाग होता. या तरुणाईला आवरताना पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची नाकीनऊ आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलीस दलाने संयुक्तरित्या विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यात वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.

एकदा जप्त केलेली वाहने संचारबंदीचा काळ संपल्यानंतर ताब्यात मिळणार असे समजतात अनेकांनी फिरणेच बंद केले. त्यामुळे रविवारी दिवसभर कामाशिवाय फिरणाऱ्यांची संख्या घटली. यासोबतच महापालिका आरोग्य विभागाने गर्दी असेल त्या ठिकाणी थेट विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲंटिजेन टेस्ट करण्याचा धडका सुरू केला आहे. यात जो पॉझिटिव्ह येईल त्याला थेट विलगीकरणात पाठविले जात आहे. यासाठी लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, राजारामपुरी , दाभोळकर कॉर्नर, छत्रपती ताराराणी चौक, जुना जकात नाका, शाहू जकात नाका, जुना वाशीनाका, संभाजीनगर, सायबर चौक आदी ठिकाणी पोलिसांसह महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील बहुतांशी दुकाने बंद नेहमी गजबजलेला भाऊसिंगजी रोड, लक्ष्मीरोड, महाद्वाररोड, पापाची तिकटी, चप्पल लेन, गंगावेश, राजारामपुरी पहिली गल्ली, शाहूपुरी, दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर वाहन जप्तीच्या धास्तीमुळे दिवसभर निमर्नुष्य झाला होता. शहरातील बहुतांशी दुकाने बंद होती. 

घर सोडून बाहेर न जाणेच अनेकांनी केले पसंतयोग्य कारण न देऊ शकलेल्या वाहनधारकांची वाहने जप्त केल्यानंतर ती शहर वाहतूक शाखेत अथवा थेट मुख्यालयाच्या मैदानात नेली जात आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारकांना वाहनाविना चालत जावे लागले. याबरोबर महापालिका कर्मचारीही अशा विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची रॅपिड ॲंटिजेन टेस्ट करू लागले आहेत. यात जर वाहनधारक पॉझिटिव्ह आला तर त्याची रवानगी थेट विलगीकरणात होऊ लागली आहे. याची धास्ती विनाकारण फिरणाऱ्यांनी घेतल्यामुळे रविवारी दिवसभरात अनेकांनी घर सोडून बाहेर न जाणेच पसंत केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMarketबाजार