शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

यंदा हंगाम तीन महिन्यांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:52 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याचे साखरचे ‘कोठार’ म्हणून पश्चिम महाराष्टÑ ओळखला जातो; पण महापूर आणि ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्याचे साखरचे ‘कोठार’ म्हणून पश्चिम महाराष्टÑ ओळखला जातो; पण महापूर आणि अतिवृष्टीने हे कोठार यंदा रितच राहणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उसाचे ८० लाख टनाने उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तविला जात असून, गळीत हंगाम तीन महिने चालविताना साखर कारखान्यांची दमछाक होणार आहे. उसाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहेच, त्याचबरोबर अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडलेले साखर कारखाने आणखी अडचणीत येणार, हे मात्र निश्चित आहे.राज्याच्या एकूण ऊस उत्पादनापैकी ३० टक्के ऊस हा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत उत्पादित होतो. मागील हंगामात राज्यात ९ कोटी ५१ लाख टन गाळप झाले होते, त्यामध्ये सर्वाधिक दोन कोटी १६ लाख गाळप कोल्हापूर विभागाचे होते. विशेष म्हणजे अवघ्या ३८ कारखान्यांनी हे गाळप केले असून, साखर उताºयातही हा विभाग आघाडीवर राहिला; पण यंदा हे कोठार अडचणीत सापडले आहे. जुलै-आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरवरील ऊस बाधित झाला आहे. त्याच पटीत सांगली जिल्ह्यातील उसाचे नुकसान झाले. पूरबाधित नाही तिथे एकसारख्या पावसाने वाढ खुंटली. ज्या काळात उसाची वाढ झपाट्याने होते, त्याच काळात पाऊस राहिल्याने वाढीवर परिणाम झाला; त्यामुळे पूरबाधित उसाचे ५० टक्क्याने, तर इतर उसाचे २० ते २५ टक्क्यांनी उत्पादन घटणार आहे. सरासरी ३५ टक्के घट जरी झाली, तरी गेल्या हंगामापेक्षा ८० लाख टन उसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामध्ये कोल्हापुरात ८० ते ९० लाख टन, तर सांगलीत ५५ ते ६० लाख टनापर्यंत उत्पादन खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एकरकमी ‘एफआरपी’वर ठाम?महापूर व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे; त्यामुळे किमान एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे, यावर ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना ठाम राहणार आहे. मागील हंगामात बहुतांशी कारखान्यांनी दोन, तर काही कारखान्यांनी तीन टप्प्यांत एफआरपी दिली होती. तोच फॉर्म्युला यावर्षी राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.हंगाम महिनाभर लांबणीवरकर्नाटकात आॅक्टोबर अखेरीस हंगाम सुरू होत असल्याने सोलापूर, सांगली व कोल्हापुरातील सीमाभागातील कारखान्यांची १ नोव्हेंबरलाच धुराडी पेटत होती.यंदा मात्र परतीच्या पावसाने शिवारात पाणी उभे आहे, पाणी कमी होऊन जमिनीला वापसा येण्यास अजून १५ दिवस लागणार आहेत; त्यामुळे जर पाऊस थांबला, तर १५ नोव्हेंबरनंतर काही कारखाने सुरू होतील, अन्यथा नोव्हेंबरच्या शेवटचा आठवडा उजाडू शकतो.कारखाना अन् ‘एफआरपी’ रक्कमशाहू २८७८हमिदवाडा २९५३बिद्री २९६४भोगावती २८३७घोरपडे २६६९कुंभी २९२९जवाहर २८७४शिरोळ २८३५शरद २८२७गुरुदत्त ३०७०पंचगंगा २९४६आजरा २७४६राजाराम २७७१वारणा २६००दालमिया ३०१७गडहिंग्लज २७०३डी. वाय. २७६९गायकवाड २८२८इको केन २६१७हेमरस २८७०महाडिक २३१७तांबाळे २६३८