शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

करंजफेणला ताकदवान उमेदवाराचा शोध

By admin | Updated: January 24, 2017 00:38 IST

काटा लढत होण्याचे संकेत : जनसुराज्य, काँग्रेस, भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी अशी होणार लढत

राजाराम कांबळे -- मलकापूर -पूर्वीचा पणुंद्रे मतदारसंघ आता करंजफेण झाला आहे. मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. या मतदारसंघातून जनसुराज्य, काँग्रेस व भाजप आघाडीकडून विद्यमान पंचायत समिती सदस्या वंदना संजय पाटील, नीलिशा नीलेश बेर्डे, दिशा दिलीप सोष्टे, तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आकांक्षा अमर पाटील, वैशाली सर्जेराव गुरव, स्मिता सर्जेराव पाटील या इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदार संघातील लढाई जनसुराज्य, काँग्रेस व भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी अशीच होणार आहे. आतापर्यंत या मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले.पणुंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघाचे नाव बदलून सध्या करंजफेण जिल्हा परिषद मतदारसंघ असे झाले आहे. या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. येथे माजी आमदार कै. संजयसिंह गायकवाड यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसचे योगीराज गायकवाड करीत आहेत. या मतदारसंघातून जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, डॉ. स्नेहा जाधव, योगीराज गायकवाड विजयी झाले होते. गतनिवडणुकीत शिवसेना व काँग्रेस अशी युती होती. या युतीकडून योगीराज गायकवाड निवडून आले होते. मात्र, सध्या तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. वारणा उद्योग समूहाचे नेते विनय कोरे यांची साथ सोडून मानसिंगराव गायकवाड आमदार सत्यजित पाटील यांच्या सोबत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आमदार सत्यजित पाटील यांनी विनय कोरे यांचा पराभव केला. अवघ्या थोडक्या मताने कोरे यांचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.सध्या शिवसेना व राष्ट्रवादीकडून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आकांक्षा अमर पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, तर राष्ट्रवादीच्या वैशाली सर्जेराव गुरव व माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव महिपती पाटील-माणकर यांच्या पत्नी स्मिता सर्जेराव पाटील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.जनसुराज्य, काँग्रेस व भाजप आघाडीकडून विद्यमान पंचायत समिती सदस्या वंदना संजय पाटील यांच्या नावाचा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे, तर या आघाडीकडून नीलिशा नीलेश बेर्डे तसेच मोसम गावच्या विद्यमान सरपंच दिशा दिलीप सोष्टे या इच्छुक आहेत. पणुद्रे पंचायत समिती मतदारसंघ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे, तर शाहूवाडी पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने या मतदारसंघात काटा लढत होणार आहे. शिवसेना, काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. स्नेहा जाधव, माजी जिल्हा समाज कल्याण सभापती ज्ञानदेव धोंडिबा कांबळे यांच्या पत्नी विमल ज्ञानदेव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कांबळे यांच्या पत्नी यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. जनसुराज्य, काँग्रेस व भाजप आघाडीकडून कमल परशुराम जाधव या इच्छुक आहेत. आघाडीने त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केल्याचे समजते. सध्या पणुंद्रे पंचायत समिती मतदारसंघाचे नेतृत्व उपसभापती संगीता पाटील करीत आहेत.करंजफेण पंचायत समिती गण सर्वसाधारण गटासाठी खुला झाला आहे. या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व विद्यमान पंचायत समिती सदस्य पांडुरंग पाटील करीत आहेत. जनसुराज्य, काँग्रेस व भाजप आघाडीतून संजय पाटील (गजापूर), रामचंद्र पाटील (कांटे), युवराज पाटील (करंजफेण), ज्ञानदेव वरेकर (अणुस्कुरा), तुकाराम कांबळे (शेंबवणे), आदी उमेदवार इच्छुक आहेत, तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंचायत समिती सदस्य पांडुरंग पाटील (पेंडाखळे), उदय साखरचे संचालक राजाराम चव्हाण (येळवण जुगाई), सरपंच सुशील वायकूळ (मांजरे), सर्जेराव माणकर (माण), ज्ञानदेव कांबळे (म्हाळसावर्डे), सर्जेराव गुरव (करंजोशी), आदी इच्छुक आहेत.अपक्ष म्हणून दीपक कांबळे (मांजरे), शरद कांबळे (येळवण जुगाई) या उमेदवारांनी जोरदार तयारी करून प्रचार सुरू केला आहे. पणुंद्रे पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवारांनी गावा-गावांत प्रचार सुरू केला आहे. तिकीट मिळो... अगर न मिळो... काहींनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. पणुंद्रे व करंजफेण या दोन गणांतील उमेदवारांचा जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला फायदा होण्यासाठी सर्व बाजंूनी सक्षम असणाऱ्या उमेदवाराला तिकीट मिळणार आहे.मतदारसंघातील गावेपणुंद्रे, शिंदेवाडी, म्हाळसवडे, वालूर, जावळी, कासार्डे, एैनवाडी, धनगरवाडी, माण, परळे, उचत, कोळगाव, टेकोली, कोळगाव, टेकोली, शिराळे तर्फे मलकापूर, आंबार्डे, आरुळ, करंजोशी,चनवाड, करंजोशी, करंजफेण, गावडी, येळवण जुगाई, परिवणे, गिरगाव, मांजरे, गेळवडे, बुरबांळ, पेंडाखळे, कातळेवाडी, मालापूरे, बर्की, गजापूर-भाततळी, विशाळगड, गावडी, शेंबवणे, मोसम कुंभवडे, अणूस्कुरा, मरळे, काटे- येळवडी.